ताज्या घडामोडीमराठवाडा

*आष्टीच्या दूध संकलन केंद्रांवर अन्नभेसळ अधिकार्‍यांचे छापे;दूध भेसळीचा संशय*

शेअर करा

 

आष्टी दि .25फेब्रुवारी।टीम सीएम न्यूज

Advertisement

आष्टी तालुक्यात दुधात भेसळ होत असल्याच्या तक्रारी राज्याच्या अन्नभेसळ अधिकार्‍याकडे गेल्यानंतर याची दखल घेत पथकाने आष्टी येथील  केंद्रावर छापे मारून तेथील दुध तपासणीसाठी लॅबमध्ये पाठवले. एकाच वेळी वीस ठिकाणी छापे मारण्यात आल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली.

आष्टी तालुक्यामध्ये दुधाचे मोठ्या प्रमाणात संकलन होत आहे. दुधात काळ-बेर होत असल्याच्या तक्रारी राज्याच्या अन्नभेसळ अधिकार्‍याकडे करण्यात आली होती. या तक्रारीची दखल घेत अधिकार्‍याचे एक पथक आष्टीत दाखल झाले. अधिकार्‍यांनी वाघळुज, बाळेवाडी, कुंबेफळ, खुंटेफळ, टाकळी (आमिया) या पाच गावातील दुध संकलन केंद्रावर अचानक धाडी टाकल्या असून या सर्व दुध संकलन केंद्रावरील दुधाचे नमुने तपासणीसाठी घेतले असून ते प्रयोगशाळेत पाठवले. गेल्या अनेक दिवसापासून तालुक्यात मोठ्या प्रमाणात दुधात भेसळ होत असून या अगोदरही तालुक्यात विविध ठिकाणी भेसळी होत असल्याचे आढळून आले होते. यानंतर पुन्हा तालुक्यात दुध भेसळीचे प्रमाण वाढले असल्याने स्थानिक तक्रारीवरून राज्यातील अन्नभेसळ अधिकार्‍यांनी आज पाच गावात छापे टाकले. या कारवाईमध्ये अन्नसुरक्षा अधिकारी सहाय्यक आयुक्त व सहआयुकत अधिकारी यांचा समावेश असून पथकात व्ही.डी.पाटील, पी.एस.पाटील, किशोर बावीसकर, निलेश दुधाडे, शरद पवार, उमेश सुर्यवंशी, सतिश हाके, राजेश बडे, संदिप देवरे, बप्पा भोसले, आर.एल.महाजन, राहुल खंडागळे, गुलाब ओसावे, सागर तेरकर यांच्यासह राज्यातील सोलापूर, नाशिक, मुंबई आणि पुणे येथील अन्नभेसळचे अधिकारी यात सहभागी आहेत.

Advertisement

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!
Close
Close
%d bloggers like this: