ब्रेकिंग न्यूज

*आष्टीत ऍम्ब्युलन्स जाळण्याचा प्रयत्न; संतप्त नातेवाईकांचा प्रयत्न*

108 रुग्णवाहिका न दिल्याने केला प्रकार

शेअर करा

 

आष्टी दि,21 टीम सीएमन्यूज

गरोदर महिलेला पुढील उपचारासाठी बीड येथे नेण्यासाठी ऍम्ब्युलन्स उपलब्ध करून दिली नाही म्हणून संतप्त जमावाने ऍम्ब्युलन्स जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना आष्टी येथे घडली.

आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयांमध्ये दाखल असलेल्या एका गरोदर महिलेला पुढील तपासणीसाठी बीड येथे जाण्याचा सल्ला आष्टी ग्रामीण रुग्णालयात देण्यात आला.
रुग्णालयाच्या बाहेर असलेली ऍम्ब्युलन्स उपलब्ध करून देण्याची त्यांनी मागणी केली मात्र संबंधित त्या संबंधित चालकाने तुम्ही 108 नंबर ला फोन लावून त्यांना कल्पना द्या असे सांगितल्याने या गोष्टीचा राग येऊन या गरोदर महिलेच्या नातेवाईकांनी आष्टी ग्रामीण रुग्णालयाच्या बाहेर असलेल्या ऍम्ब्युलन्स ला जाळण्याचा प्रयत्न केला.
या घटनेची माहिती आष्टी पोलीस ठाण्यात कळतात आष्टी पोलीस ठाण्याचे पीआय माधव सूर्यवंशी यांनी आष्टी ग्रामीण रुग्णालयाला भेट दिली.
ही ऍम्ब्युलन्स जाळण्याचा प्रयत्न करणाऱ्या या महिलेच्या नातेवाईकांवर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close