ताज्या घडामोडीशैक्षणिक

*कडा येथील अमोलक बी फार्मसी कॉलेजमध्ये महिला दिनी झाला आत्मसन्मानाचा जागर*

शेअर करा

 

कडा,

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून अमोलक शिक्षण संस्थेच्या फार्मसी कॉलेजमध्ये झालेल्या कार्यक्रमात महिला आत्मसन्मानाचा जागर करणयात आला .
कडा येथील अमोलक जैन विद्या प्रसारक मंडळाच्या कॉलेज ऑफ फार्मास्युटिकल अँड रिसर्च इन्स्टिट्यूट अर्थात बी फार्मसी कॉलेज आणि रसिकलाल धारिवाल डी फार्मसी कॉलेजच्या वतीने सोमवारी महिला दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

आष्टीच्या नायब तहसिलदार शारदा दळवी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या . तर वैद्यकीय अधिकारी डॉ प्रियंका शिंदे , महिला दक्षता पथक प्रमुख श्यामल थोरात यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या प्रारंभी हैदराबाद डॉ प्रियांका रेड्डी आणि हिंगणघाट येथील फुलराणी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली . आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना शारदा दळवी म्हणाल्या की , मुलींनी सर्व दुष्टीने स्वयंपूर्ण झाले पाहिजे .महिला , मुलींनी आत्मसन्मान जागृत ठेवून जीवन जगले पाहिजे . स्पर्धा परीक्षा हे करियर घडवण्यासाठी चांगले मध्यम आहे . आजच्या स्रियांना मानसन्मान नको आहे तर त्यांना त्यांचा हक्क आहे . आजकाल मुली शिकू लागल्याने त्यांची मानसिक गुलामगिरीमधून मुक्तता होऊ लागली आहे .
श्यामल थोरात यांनी मुलींना त्यांच्या संरक्षणार्थ उपलब्ध कायद्याची तसेच दामिनी आणि शक्ती पथकाची माहिती दिली . डॉ प्रियंका शिंदे , डॉ सुपर्णा देशमुख यांनी ही यावेळी मनोगत व्यक्त केले . प्रा मधुराणी दळवी – राऊत यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले . साक्षी चानोदिया आणि पल्लवी गवळी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर प्रा सुजाता गरुड यांनी आभार मानले . प्रा भाग्यश्री बोरा , पोलीस कर्मचारी मुंडे , आरोग्य सेविका सारिका गायकवाड या व्यासपीठावर उपस्थित होत्या.

कार्यक्रमास बी फार्मसी , डी फार्मसी , बीसीएच्या विद्यार्थिनीसह इतर महिला उपस्थित होत्या . कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्था चालकांसह प्राचार्य योगेश बाफना , प्रा जवाहर भंडारी , सोभाचंद ललवाणी , प्रा जयेश बलदोटा , प्रा प्राजक्ता खेडकर , निखिल कस्तुरे , अन्सार सय्यद , पवार मामा यांचे सहकार्य लाभले.

Advertisement

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!
Close
Close
%d bloggers like this: