ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

*कड्यात नेत्रदीपक शिवजन्मोत्सव साजरा ;शिवकालीन मर्दानी खेळानी लक्ष वेधले*

शेअर करा
कडा दि.१९ फेब्रुवारी/टीम सीएम न्यूज
                    सालाबाप्रमाणे यंदाही सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने शिवजन्मोत्सव मोठ्या थाटात संपन्न करण्यात आला. मिरवणूकीतील शिवकालीन विविध मर्दानी खेळाने कडेकरांची चांगगलीच दाद मिळवली. फुलांनी सजविलेल्या आकर्षक रथामधून छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत शिवप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
आष्टी तालुक्यातील कडा येथील नेत्रदीपक शिवजन्मोत्सव हा सममस्त शिवभक्तांसाठी ख-या अर्थाने  परवणीच असतो. हा सार्वजनिक शिवमहोत्सव शांततेत व खेळीमेळीच्या वातावरणात साजरा करण्यासाठी शिवप्रेमींसह पोलिस बांधव सक्रिय परिश्रम घेतात. सालाबादप्रमाणे यंदा देखील शिवजन्मोत्सवाचे भगव्यामय उत्साही वातावरणात लक्षवेधी आयोजन करण्यात आले होते.
कडा शहरातील प्रमुख मार्गावरुन आकर्षक फुलांनी सजवलेल्या रथामधुन फटाक्यांची आतिषबाजी करित शिवाजी राजांची मिरवणूक काढण्यात आली. ठिकठिकाणी रस्त्यांच्या दुतर्फा भगव्या पताका लावण्यात आल्या होत्या. घराघरासमोर सडा, रांगोळी काढण्यात आली होती. शिव मिरवणुकीत महाराजांचा जयघोष करित हिंदू-मुस्लिम बांधव भगवे फेटे बांधून सहभागी झाले होते. विशेष म्हणजे या मिरवणुकीत घोडे, उंट आणि  शिवकालीन वेशभूषा धारण केलेल्या अनेक मावळयांसह तलवारबाजी, दांडपट्टा, मलखांब सारख्या मर्दानी खेळाने नागरीकांचे लक्ष वेधले. यासह मिरवणुकीत  पारंपारिक वाद्य, नामांकीत बँड, ढोलीबाजा, लेझिम पथक सहभागी झाले होते.
शिव मिरवणूक शांततेत संपन्न व्हावी, याकरिता  एपीआय सलीम पठाण, पीएसआय यादव, पो.काॅ. अनिल आगलावे, बाबासाहेब गर्जे, मुद्दसर शेख, संतोष नाईकवडे, मनोज खंडागळे, दादा भगत, सुनील कांबळे, पठाण, मंगेश मिसाळ, बंडू, दुधाळ, होमगार्ड, व इतर पोलिस कर्मचा-यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close