कृषीवार्ताशैक्षणिक

कृषी महाविद्यालय आष्टी येथे व्यावसायिक भाजीपाला उत्पादन प्रकल्प सुरु*

शेअर करा

 

 

 

 

आष्टी दि.12 मार्च । टीम सीएमन्यूज

आष्टी येथील आनंद चॅरिटेबल संस्था संचलित छत्रपती शाहू-फुले-आंबेडकर कृषी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी व्यावसायिक भाजीपाला उत्पादन प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्रीराम आरसूळ, प्रभारी प्राचार्य काळे पी आर यांच्या हस्ते या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले हा प्रकल्प कृषी महाविद्यालयाच्या शेडनेट मध्ये सुरू करण्यात आला असून या प्रकल्पांमध्ये विविध प्रकारचा भाजीपाला लागवड करण्यात आला आहे यामध्ये भेंडी, शिमला मिरची, टोमॅटो, दोडका, कारले, गवार, गाजर, मुळा, कोथिंबीर, मेथी, पालक लागवड करण्यात आले असून यामध्ये कमी खर्चा मध्ये जास्त उत्पादन कसे घेता येईल याकडे लक्ष दिले जाते यावेळी उद्यान विद्या विभागाचे प्रकल्प अधिकारी प्राध्यापक पवार बी. जी व सहकारी प्राध्यापक मस्के ए एम हे उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close