fbpx
ताज्या घडामोडीमराठवाडा

केज : *केजमध्ये पत्रकारांच्या आवाहनाला पोलिसांची साथ,वंचित कुटुंबाना केले राशनचे वाटप*

शेअर करा

 

केज दि.२७ ,टीम सीएमन्यूज

Advertisement

केज येथे केज-बीड राज्य महामार्गालगत रस्त्याच्या बाजूला असलेल्या बसडेपोच्या जागेवर पाल ठोकून बसलेले काही कामगारांना हाताला काम नाही आणि जवळ किराणा भरण्यासाठी पैसे नाहीत. त्यामुळे या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे.त्यामुळे या वचिंताची अवस्था अत्यंत अवघड बनली आहे.अशी बातमी दैनिक झुंजारनेताचे जेष्ठ पत्रकार श्रावणकुमार जाधव यांनी खबर केजची या वाँटसप ग्रुपवर टाकली होती.व प्रशासनाने किंवा लोकप्रतनिधीनी याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे कळविले होते.या वृत्ताची तातडीने दखल घेत केज पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक प्रदिप त्रिभूवन यांनी जेष्ठ पत्रकार श्रावणकुमार जाधव यांच्या आवाहानाला प्रतिसाद देऊन बसडेपोच्या जागेत पाल ठोकून बसलेल्या या कुंटुबाला गहू,तांदूळ,

साखर,गोडतेल आदी सामानाचे तातडीने वाटप केले.केज नगरपंचायतीच्या वतीने शहरातील साफसफाई चे काम करण्यासाठी ठेकेदारांला दिले आहे. या ठेकेदारांने रोंजदारीवर दहा ते पंधरा कुटुंबे शहरात आणून त्यांच्या मार्फत साफसफाईचे काम करवून घेतले जात आहे. परंतु सध्या सगळीकडेच कोरोनाच्या भितीने संपूर्ण देशात लाँकडाऊन केले आहे.यामुळे शहरात जमावबंदी आदेश लागू आहे. यामुळे या लोकांना कुठे मोलमजुरी करता येत नाही.तर ठेकेदारांने वेळेवर पैसे न दिल्या मुळे त्यांना उपजिवीका भागविणे अवघड झाले असल्याने त्यांनी पाडव्याच्या सणाला शहरात भिक मागून लेकराबाळांना जेवायला घातले.दररोज मोलमजूरी करुन उपजिविका भागविणाऱ्या या मजुरांच्या डोळ्यात भूकेने व्याकूळ होऊन त्यांच्या डोळ्यातून आश्रू वाहतांना दिसले.

त्यांच्याकडे पैसेही नाहीत कामधंदा करता येत नाही अन्न धान्य नाही किराणा सामान नाही.भिक मागून लेकरांना खाऊ घालत असल्याचे

सांगितले.कोरोनाच्या भितीमुळे लोक भिक देखील वाढत नाहीत.अत्यंत वाईट अवस्था या लोकांची बनली आहे.हाताला कोणते कामही नाही जवळ पैसेही नाहीत गावी परत जायची सोय नाही अशा परिस्थितीत आमचे बेहाल होत आहेत आता काय करावे अशी व्यथा त्यांनी बोलून दाखवली आहे.त्यामुळे पत्रकार श्रावणकुमार जाधव यांनी या वंचित कुंटुबाची व्यथा सोशल मिडीयावर टाकली आणि अवघ्या काही वेळातच केज पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रदिप त्रिभूवन यांनी तातडीने दखल घेतली. तर याच वेळी हारुण इनामदार यांनी मदत करणार असल्याचे सांगून लगेच जिवनावश्यक वस्तू घेऊन त्यांचे कर्मचारी श्री दत्तात्रय हंडीबाग यांना पाठवले.हे सर्व साहित्य पोनि.त्रिभूवन साहेब यांनी त्यांचे सहकारी

पीएसआय मिसळे साहेब,काळे साहेब, सिद्दे साहेब, ए.एस.आय.सरवदे साहेब, नामदास, मतीन, राहूल नाडागुढे, आदीसह पत्रकार श्रावणकुमार जाधव ,दत्तात्रय हंडीबाग,धनंजय कुलकर्णी यांच्या उपस्थितीत हे राशनचे वाटप करण्यात आले.त्यामुळे खाकीतील माणुसकी आणि सामाजिक बांधिलकी यावेळी दिसून आली.पत्रकारांच्या आवाहानाला पोलिसांनी दिलेल्या या प्रतिसादाबद्दल केज पोलिसांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.

Advertisement

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close