शेअर करा
इंदोरी ,दि 12 एप्रिल ,टीमसीएम न्यूज
अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील चास येथील मुळा नदीवर पोहायला गेलेल्या मामा आणि दोन भाच्याचा बुडून मृत्यू झाल्याची घटना दुपारी घडली .मृत्यू झालेल्या मध्ये जिल्हा परिषदेचे आदर्श शिक्षक सुनील तुकाराम वाडेकर यांचा समावेश आहे .
दुपारी पोहायला शिक्षक सुनील वाडेकर आणि त्यांचे भाचे प्रवीण दत्तात्रय फाफाळे आणि सचिन दत्तात्रय फाफाळे हे पोहायला नदीवर गेले होते .याच नदीवर कोल्हापूर पद्धतीचा बंधारा बांधण्यात आलेल्या आहे .या बंधाऱ्यामुळे पाण्याचा अंदाज न आल्याने हे तिघेजण बुडून मरण पावले .त्यांच्या बुडण्याचा आवाज आल्याने आजूबाजूच्या नागरिकांनी केटी वेअर वर गर्दी केली .उशिरा त्यांचा मृतदेह शोधण्यात आले .त्यानंतर त्यांच्या मृतदेह अकोले येथे पोस्टमार्टेम करण्यासाठी आणण्यात आले .