ताज्या घडामोडीमहाराष्ट्रशैक्षणिक

*कॉपी प्रकरणी देऊळगाव घाट च्या प्राचार्यांना नोटीस*

शेअर करा


आष्टी दि 20 फेब्रुवारी । टीम सीएमन्यूज

इयत्ता बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेत इंग्रजी विषयाच्या पेपरला केंद्र संचालक म्हणून कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवून ज्ञानेश्वर विद्यालय देऊळगाव घाटचे मुख्याध्यापक यांना
आष्टीचे गटशिक्षणाधिकारी धनंजय शिंदे यांनी नोटीस बजावली आहे .
दिनांक 18 फेब्रुवारी रोजी आष्टी तालुक्यातील देऊळगाव घाट येथील बारावी परीक्षा केंद्राला गटशिक्षणाधिकारी धनंजय शिंदे आणि शिक्षणाधिकारी यांनी भेट देऊन या ठिकाणी पाच विद्यार्थ्यांना कॉपी करताना रंगेहात पकडले. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या गैरप्रकाराच्या कायद्यानुसार कारवाई करण्यात आली. एकाच वेळी पाच विद्यार्थ्यांवर कॉपी केस झाल्यामुळे परीक्षा केंद्रावरील गलथानपणा उघडकीस आला आहे.

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या नियमानुसार केंद्रावर पुरेशी विजेची व्यवस्था, पुरेशी प्रकाश व्यवस्था, पुरेश्या, वर्गखोल्या आणि एकाच इमारतीमध्ये परीक्षा होणे आवश्यक आहे ,मात्र या सुविधांचा अभाव असल्याने मुख्याध्यापक यांना गटशिक्षणाधिकारी शिंदे यांनी नोटीस बजावली आहे.

मुख्याध्यापकांनी बोर्डाची परीक्षा एकाच इमारतीत घेणे बंधनकारक असताना त्यांनी परीक्षेसाठी जिल्हा परिषदेचे तीन वर्गखोल्या वापरल्याची कुठलीही कल्पना पथकाला दिली नाही. त्यामुळे त्यांनी नियमाचा भंग केला तसेच ज्या जिल्हा परिषदेच्या शाळेचे वर्ग परीक्षेसाठी वापरले त्यांचीही पूर्वपरवानगी घेतली नसल्याचे पुढे आले आहे. यासंदर्भात जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापकांना परवानगी असल्याचे खोटे सांगितल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे, तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी अथवा शिक्षण अधिकारी यांची परवानगी न घेता परिषदेचे वर्ग वापरण्यात आल्याचे निदर्शनास आले आणि कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवून त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे .या प्रकारामुळे आष्टी तालुक्यातील शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे

जिल्हा परिषद शाळा वर कारवाई होणार का?

इंग्रजी विषयासाठी वापरण्यात आलेल्या जिल्हा परिषद शाळेचे वर्ग त्यादिवशी पूर्ण दिवसभर बंद होते त्यामुळे त्या शाळेच्या मुख्याध्यापक यांना याचा त्रास होणार असल्याचे या प्रकरणावरून सध्या तरी दिसत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close