Top-न्यूजब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्र

*कोपरगावातील कोरोना बाधित ६० वर्षीय महिलेच मृत्यू*

*अहमदनगर जिल्ह्यातील कोरोनाचा पहिला बळी*

शेअर करा

अहमदनगर, दि. १४ एप्रिल ,टीम सीएम न्युज

Advertisement

 

 

कोपरगाव शहरातील कोरोना बाधित आढललेल्या ६० वर्षीय महीलेचा आज पहाटे मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली. या महिलेला श्र्वसनाचा तसेच रक्तदाबाचा त्रास होत होता. तिला काही दिवसापूर्वी श्वासोच्छवासाचा त्रास होऊ लागल्याने बूथ हॉस्पिटल मधून जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे तिच्यावर उपचार सुरू होते. यामुळे जिल्ह्यात या महिलेच्या मृत्युमुळे कोरोनाचा पहिला बळी गेल्याची घटना घडली आहे.
दरम्यान, परिस्थितीचे गांभीर्य ओळखून नागरिकांनी घराबाहेर पडू नये, सार्वजनिक संपर्क टाळावा आणि जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले आहे.

कोपरगाव येथील या महिलेचा अहवाल दि. १० एप्रिल रोजी कोरोना बाधीत असल्याचा अहवाल पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त झाला होता. त्यानंतर त्या महिलेला बूथ हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, तिला श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने आणि रक्तदाब वाढल्याने त्याच दिवशी तिला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले होते. तेथे तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. मात्र, आज पहाटे तिची प्राणज्योत मावळली.

या महिलेच्या मृत्यू मुळे जिल्ह्यात कोरोना चा पहिला बळी गेला आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वताची काळजी घ्यावी आणि विनाकारण घराबाहेर पडू नये. संपर्क टाळावा आणि प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्हावासियांना केले आहे.

कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव पाहता हे संकट जास्त वाढू नये, यासाठी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा सतर्क असून त्यासाठी विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या आहेत. नागरिकांनी स्वयंशिस्त पाळून कायद्याचे पालन करावे, असे ते म्हणाले.

Advertisement
Tags

Related Articles

Back to top button
Don`t copy text!
Close
Close
%d bloggers like this: