ताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

*कोरोनाने बीड जिल्हा व्यापला;गावागावात कोरोना,156 रुग्ण*

शेअर करा

 

बीड दि 11 सप्टेंबर,प्रतिनिधी

बीड जिल्ह्यात आज आलेल्या कोरोना अहवालात 156 रुग्ण बाधित आढळून आले. त्यामध्ये सर्वाधिक रुग्ण बीड मधील 25 आहेत.आष्टीतील 14 बधितांचा समावेश आहे.आजच्या आलेल्या अहवालावरून कोरोना (corona) गावागावात पोहचला असल्याचे चित्र दिसत आहे.

आज बीड जिल्ह्यातील 898 अहवाल प्राप्त झाले .त्यामध्ये 742 निगेटिव्ह आढळून आले आहेत.त्यामध्ये 156 कोरोना बाधित आढळून आले आहेत.परळी 24 बीड 25 ,अंबाजोगाई 15,केज 10,माजलगाव 16, धारूर 16 ,पाटोदा 04 आष्टी 14,शिरूर 09,वडवणी 09,गेवराई 14 जणांचा समावेश आहे.
बीड जिल्ह्यातील अकरा तालुके पूर्णपणे कोरोना ने व्यापले असून आजच्या अहवालानुसार गावागावात कोरोना आढळून आल्याचे चित्र आहे.गेल्या दोन दिवसांपासून बिनधास्त पणे नागरिकांचा वावर वाढला आहे.बीड जिल्ह्यात कोरोना नसल्यासारखे नागरिक वावरताना दिसत आहेत.या यादीवर नजर मारल्यास जिल्ह्यातील छोट्या गावांमध्ये वाडी वस्त्यांवर कोरोनाची लागण झाल्याचे दिसून येत आहे.त्यासाठी व्यापक प्रमाणात टेस्टिंग सुरू करण्यात येत आहेत.

हेही वाचा:*we will never forget म्हणत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जागविल्या 11 सप्टेंबरच्या आठवणी*

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close