पोलीस कर्मचाऱ्यास लाच घेताना रंगेहात पकडले
पोलीस कर्मचाऱ्यास लाच घेताना रंगेहात पकडले

 

बीड दि.27 डिसेंबर/प्रतिनिधी

बीड शहरात एका पोलीस कर्मचाऱ्यास लाच घेताना रंगेहात पकडले.ही कारवाई बीडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली.
बसस्थानक परिसरातील पोलीस चौकीमध्ये एका पोलीस कर्मचाऱ्यास सात हजाराची लाच घेतांना रंगेहाथ पकडले. रविवारी (दि.27) दुपारच्या सुमारास बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली.
चरणसिंग वळवी असे पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.
वळवी हे शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नियुक्ती आहे. तक्रार अर्जात कारवाई न करण्यासाठी तक्रारदाराकडे सात हजार रुपय लाचेची मागणी केली
होती. लाचलचुपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचत बस स्थानकातील पोलीस चौकीमध्ये सात हजाराची लाच घेतांना वळवी यांना रंगेहाथ पकडले. ही कारवाई
पोलीस अधीक्षक राहुल खाडे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ.अनिता जमादार, उपअधीक्षक बाळकृष्ण हनपुडे
यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि.रवींद्र पाडावी,
पोना.श्रीराम गिराम, गोरे, पोशि.गारदे, कोरडे यांनी केली.

हेही वाचा:अमरावती जिल्ह्यातील शहीद सैनिकाचा आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

Share this story