*विनाकारण फिरणाऱ्या 246 दुचाकी वाहनांवर बीड पोलिसांची कारवाई*
*विनाकारण फिरणाऱ्या 246 दुचाकी वाहनांवर बीड पोलिसांची कारवाई*

*विनाकारण फिरणाऱ्या 246 दुचाकी वाहनांवर बीड पोलिसांची कारवाई*

बीड दि , 17 एप्रिल ,टीम सीएमन्यूज

संचारबंदी शिथिलीकरण कालावधीत विनाकारण फिरणाऱ्या 246 दुचाकी वाहनांवर बीड पोलिसांची कारवाई करून विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

संचार बंदीच्या काळात जिल्ह्यात अवैध धंदे,संचारबंदीत संधीचा फायदा घेवून लोकांची फसवणुक करणारे, संचारबंदीच्या नियमांचे उल्लंघन करणारे,विनाकारण रस्त्यांवर फिरणारे यांच्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधिक्षक हर्ष.ए.पोद्दार यांनी
जिल्ह्यातील पोलीस यंत्रणेला दिलेले आहेत.

यातूनच अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांनी जिल्ह्यातील शहरी पोलीस ठाण्यांमध्ये शिथीलकरण कालावधीत विनाकारण वाहने घेवून रस्त्यांवर फिरणार्यांवर गुन्हे दाखल करण्याबाबत सुचना दिल्या होत्या. संचारबंदी शिथिलीकरण कालावधीत नागरिकांनी दुचाकी घेवुन घराबाहेर न पडता पायी चालत जावुन जवळच्या भागातून अत्यावश्यक सेवा प्राप्त कराव्यात असे अपेक्षित आहे आणि याच कारणास्तव अत्यावश्यक सेवा देणारे वाहने वगळता इतर वाहनांना बीड जिल्ह्यात इंधन देणे बाबत ,पेट्रोल पंप चालकांना सक्त मनाई करण्यात आले आहे. अशा प्रकारचे नियम जिल्हाधिकारी बीड यांच्या कडून पुर्ण जिल्ह्यात लागू आहेत. या नियमाची पायमल्ली करत नागरिक संचारबंदी शिथिलीकरण कालावधीत मोठ्या प्रमाणात वाहनांचा वापर करून विशिष्ट भागात गर्दी करत आहेत. अशा प्रकारच्या दुचाकी व चारचाकी वाहनधारकांवर यापूर्वी पहिल्या टप्यामध्ये दंडात्मक कारवाई करुन नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न बीड पोलीसांनी केला होता. तरी दंडात्मक कारवाया करून नियंत्रण प्राप्त झाले नसल्याने बीड पोलीसांनी खबरदारीचा उपाय म्हणून गुन्हे दाखल करून कडक कारवाई करण्यास सुरवात केली आहे.

संचारबंदी शिथिलीकरण असतांना विनाकारण लोक दुचाकी वाहने घेवून घराबाहेर पडून रस्त्यावर गर्दी करत होते म्हणुन त्यांच्यावर खालील नमुद पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
1. बीड शहर-53 दुचाकी वाहने,
2. पेठ बीड-14 दुचाकी वाहने 3.शिवाजीनगर-50 दुचाकी वाहने
4. बीड ग्रामीण- 05 दुचाकी वाहने
5. पिंपळनेर- 40 दुचाकी वाहने
6. अंबाजोगाई ग्रामीण-23 दुचाकी वाहने
7. अंबाजोगाई शहर-50 दुचाकी वाहने
8. परळी शहर- 05 दुचाकी वाहने
9. संभाजीनगर- 06 दुचाकी वाहने
या 09 पोलीस ठाण्यांमध्ये 246 दुचाकी वाहनांवर वेगवेगळे 09 गुन्हे भादंवि कलम
188,269,270, आपत्ती व्यवस्थापन कारयदा कलम 51 ब,महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 17 प्रमाणे दाखल करण्यात आले असून सदरचे 246 वाहने जप्त करण्यात आली आहेत.
वरील कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री .हर्ष ए.पोद्दार, अपर पोलिस अधिक्षक श्रीमती स्वाती
भोर,अपर पोलीस अधिक्षक श्री. विजय कबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली वर नमुद 09 पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी आणि पोलीस कर्मचारी यांनी केली आहे.

Share this story