Corona fight *कौटुंबिक हिंसा रोखण्यासाठी हेल्पलाईन सेवा सुरू*
Corona fight *कौटुंबिक हिंसा रोखण्यासाठी हेल्पलाईन सेवा सुरू*

बीड ,दि 16 एप्रिल ,टीम सीएमन्यूज

  टाळेबंदीच्या काळामध्ये सर्व नागरिक घरात बसून आहेत अशा परिस्थितीत घरामध्ये कौटुंबिक वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. घरामध्ये टेन्शन निर्माण होऊ शकते आणि त्याचे रूपांतर कौटुंबिक हिंसेमध्ये होऊ शकते .या कौटुंबिक हिंसेचे शिकार लहान मुले,वृद्ध आणि महिला होऊ शकतात .अशा वेळी यांना आधार देण्यासाठी पोलीस विभागाने पाऊले उचलली असून कौटुंबिक हिंसा रोखण्यासाठी आणि अन्याय दूर करण्यासाठी तीन अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे .
टाळेबंदीच्या काळात कुटुंबातील सर्व व्यक्ती घरात बसून आहे अशा परिस्थितीमध्ये निर्माण होणारा तणाव दूर करण्याचा प्रयत्न महिला ,मुले किंवा वृद्ध व्यक्तीवर हिंसा करून होऊ शकतो . अशा परिस्थितीमध्ये तक्रार करण्यासाठी बीड पोलिसांनी वृद्ध व्यक्ती ,महिला आणि मुलांसाठी हेल्पलाइन सुरू केली आहे.
याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार  यांनी सांगितले की ,या टेन्शनच्या काळामध्ये महिलांवर मुलांवर किंवा वृद्ध व्यक्ती वर अत्याचार होण्याची शक्यता आहे घरामध्ये बसून असल्याच्या कारणाने आपला राग व्यक्त करण्यासाठी महिला, वृद्ध व्यक्ती किंवा मुलांवर हा राग काढला जाऊ शकतो आणि या रागाला हे बळी पडू शकतात यासाठी जिल्हा पोलिसांच्या वतीने हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे. मुलांसाठी वृद्ध व्यक्तीसाठी आणि महिलांसाठी तीन स्वतंत्र अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे . यांच्याकडे तक्रार केल्यास संबंधित कुटुंबाचं समुपदेशन किंवा कारवाई पण केली जाऊ शकते असेही त्यांनी सांगितले
महिलांच्या साठी पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक सुषमा पवार यांची नेमणूक करण्यात आली असून त्यांचा मोबाईल नंबर आहे 8830 217 955
वृद्ध व्यक्तींसाठी तक्रार करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक सरस्वती राठोड यांची नेमणूक करण्यात आली आहे त्यांचा मोबाईल क्रमांक आहे 95 27 64 88 25
तर लहान मुलांच्या संदर्भात तक्रार करण्यासाठी पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक राणी सानप यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्यांचा मोबाईल नंबर आहे 77 19 96 55 77
त्याचबरोबर महिलांसाठी सुरू असलेला टोल फ्री क्रमांक 1091 हा ही कार्यरत असून महिलांनी यावरही संपर्क करू शकता असे पोलीस पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी सांगितले.

कौटुंबिक हिंसाचार रोखण्यासाठी पोलिस विभागाने पावले उचलली असून जर एखाद्या कुटुंबांमध्ये असे हिंसक वातावरण निर्माण होत असेल तर त्या कुटुंबातील व्यक्तींनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार यांनी केले आहे

Share this story