*हिंगोली:पोलिस कर्मचाऱ्यांची गोळी झाडून आत्महत्या कारण अस्पष्ट*
*हिंगोली:पोलिस कर्मचाऱ्यांची गोळी झाडून आत्महत्या कारण अस्पष्ट*

 

हिंगोली दि 20 जून ,टीम सीएम न्यूज
हिंगोली पोलीस मुख्यालयातील आरमोर ( शस्त्र दुरुस्ती विभाग ) विभागात कार्यरत पोलीस कर्मचारी जितेंद्र साळी ( वय 43) यांनी आज दुपारी कार्यालयातच एसएलआर रायफलने हनुवटीच्या खालून गोळी मारून आत्महत्या केल्याच्या दुर्दैवी घटनेने खळबळ उडाली असून आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.

घटनास्थळाचा पंचनामा करण्यात येऊन शहर पोलुस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया, पोलीस अधीक्षक योगेशकुमार, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, उपअधीक्षक रामेश्वर वैजने, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जगदीश भंडारवार यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. मयत जितेंद्र साळी कळमनुरी येथील रहिवाशी असून 2001 मध्ये पोलीस दलात भरती झाले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आहेत.

Share this story