*चौघींचे मृतदेह विहिरीत सापडल्याने खळबळ*
*चौघींचे मृतदेह विहिरीत सापडल्याने खळबळ*

 

अहमदनगर दि 2 ऑगस्ट टीमसीएम न्यूज

आईसह तीन अल्पवयीन मुलींचे मृतदेह विहिरीत सापडल्याने अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यात खळबळ उडाली आहे.या चौघींचे मृत्यू नेमका कशाने झाला याचा पोलीस तपास करत आहेत.

जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील कुसडगाव येथे एक महिला आणि तिच्या तीन मुलींचा विहीरीत मृतदेह आढळून आला.रक्षाबंधन सणाच्या पूर्वसंध्येला ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.याबाबतचे अद्याप कारण मात्र समजू शकले नाही.

जामखेड तालुक्यातील कुसडगाव येथील महिला दुपारी आपल्या शेतात काम करण्यासाठी गेली होती.त्यानंतर ती परत आलीच नाही .तिच्या सोबत तिच्या तीनही अल्पवयीन मुलीही होत्या .सायंकाळी उशिरा घरी न आल्याने त्यांची शोधाशोध केली असता त्यांचे एका विहिरीत मृतदेह आढळून आले.पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह विहिरीतून काढले असून जामखेड येथील ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणी करण्यात आली आहे.घटना स्थळाला तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक यांनी भेट दिली . मृत महिलेचे स्वाती राम कार्ले नाव असून वय 30,तिच्या मुली अंजली कार्ले 11,सायली कार्ले 9, कोमल कार्ले 6 यांचा समावेश आहे.

Share this story