गावठी कट्टा (पिस्तुल) व २ जिवंत काडतुसे बाळगणारा आरोपी जेरबंद
गावठी कट्टा

गावठी कट्टा (पिस्तुल) व २ जिवंत काडतुसे बाळगणारा आरोपी जेरबंद

नगर,प्रतिनिधी

गावठी कट्टा,अवैध शस्त्रास्त्रे बाळगणाऱ्या आरोपीविरुद्ध पोलिसांनी मोहीम उघडली असून श्रीरामपूर तालुक्यातील गोंडेगाव येथे देशी बनावटीचा कट्टा (अग्नीशस्त्र) व जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या तरुणास स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी दिली.

स्थनिक गुन्हे शाखेला मिळालेल्या माहितीनुसार गोंडेगाव ता. श्रीरामपुर येथील चितळी कडे जाणाऱ्या पुला जवळ एक सडपातळा बांध्याचा मुलगा देशी बनावटीचा कट्टा (अग्नीशस्त्र) व जिवंत काडतुसे जवळ बाळगुन फिरत होता. या ठिकाणी पोलिसांनी सापळा लावला असता हा तरुण पोलिसांच्या हाती लागला.त्याची तपासणी केली असता त्याच्याजवळ ३०,०००/- रु.किमतीचे देशी बनावटीचे गावठी पिस्तुल व ६००/- रु.किमतीचे २ जिवंत काडतुसे असा ३०,६००/- रु. किमतीचे  साहित्य आढळून आले.

या आरोपीचे नाव यश उर्फ चिक्या बाळासाहेब लांडगे वय-२२ वर्षे रा. पुणतांबा ता. राहाता जि.अहमदनगर असे आहे.

bio disel,बायोडिझेलची बेकायदेशीररित्या विक्री करणाऱ्या टोळीला केले जेरबंद

 त्याची विचारपुस केली असता त्याने सदरचा गावठी कट्टा (पिस्तुल) व काडतुसे हे त्याचे साथीदाराकडुन विकत घेतले असल्याचे त्याने सांगीतले आहे. त्याप्रमाणे त्याचे साथीदाराचा त्याचे राहते घरी शोध घेतला पंरतु तो मिळुन आला नाही. संबंधित आरोपी विरुद्ध श्रीरामपुर तालुका पो.स्टे. ला गुरनं. ॥ ३४४/२०२१, भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पुढील कारवाई श्रीरामपुर तालुका पो.स्टे. हे करीत आहेत.

सदरची कारवाई मा.श्री. बी. जी. शेखर पाटील सो., पोलीस उप महानिरीक्षक सो. नाशिक परिक्षेत्र, नाशिक यांचे आदेशाने दिपाली काळे मॅडम, अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपुर, श्री. संदिप मिटके, उप विभागीय पोलीस अधिकारी, श्रीरामपुर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी केलेली आहे.

Share this story