*बीड मध्ये तिहेरी हत्याकांड:पत्नीसह दोन मुलांचा खून*
*बीड मध्ये तिहेरी हत्याकांड:पत्नीसह दोन मुलांचा खून*

 

बीड  दि 24 मे टीम सीएमन्यूज

लॉकडाउन च्या काळात घरगुती हिंसाचाराचे प्रमाण वाढत आहे.आज बीड मधील पेठ बीड भागातील शुक्रवार पेठ भागात पत्नी सह दोन मुलांची हत्या झाल्याची घटना दुपारी उघडकीस आली आहे . हे हत्याकांड चारित्र्याच्या संशयावरून झाले की घरगुती कारणावरून याचा तपास करत  असल्याचे पोलिसांनी सांगितले.आरोपी संतोष कोकणे यास अटक करण्यात आली आहे .

पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार शहरातील शुक्रवार पेठ भागात तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली.पोलिसांनी घटनास्थळाला भेट दिली असता तिघांचे मृतदेह आढळून आले .संतोष कोकणे आपल्या पत्नी संगीता वय 31 वर्षे ,संदेश वय 10 आणि मयूर वय 7 यांच्यासह शुक्रवार पेठ भागात राहत होता .या कुटुंबातील संगीता संतोष कोकणे आणि संदेश संतोष कोकणे यांचा मृतदेह रक्तबंबाळ अवस्थेत आढळुन आला तर मयूर याचा मृतदेह पाण्याच्या बॅरेल मध्ये आढळून आला .या संदर्भात पोलिसांनी या महिलेचा पती संतोष कोकणे यास ताब्यात घेतले आहे .हे तिहेरी हत्याकांड का घडले ?याचा तपास पोलीसानी केला असून चारित्र्याच्या संशयावरून किंवा घरगुती कारणामुळे हे हत्याकांड झाले असल्याचे पोलिसांनी सांगितले.संतोष कोकणे यास अटक केली आहे .

.

Share this story