ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

*गड किल्ल्यांचे संवर्धन ही सरकारची जबाबदारी -मुख्यमंत्री उध्दव ठाकरे*

शेअर करा

 

अलिबाग दि.17फेब्रुवारी। टीम सीएमन्यूज

 

गडकिल्ल्यांचे संवर्धन ही शासनाची जबाबदारी आहे. ती जबाबदारी सरकार पार पाडेल असा विश्वास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केले.
आज पोलादपूर तालुक्यातील उमरठ येथे महाराष्ट्र शासन, जिल्हा परिषद रायगड आणि नरवीर तानाजी मालुसरे सोहळा समिती यांच्यावतीने नरवीर तानाजी मालुसरे यांच्या 350 व्या पुण्यतिथीनिमित्त समाधी वास्तूचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाला त्यावेळी ते बोलत होते.
इतिहासात रममाण होण्याऐवजी इतिहास घडविण्याचे आवाहन त्यांनी तरूणांना केले.. पोलादपूर तालुक्याच्या विकासासाठी शासन कटीबध्द असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री म्हणाले की, गडकिल्ल्यांचे संवर्धन आवश्यक आहे. गडकिल्ल्यांचे रक्षण शिवरायांनी केले ते आपले खरे वैभव आहे. गडकिल्ल्यांची माती ही चमत्कार करणारी माती आहे. यात अनेकांचे रक्त सांडले आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे नाव म्हटले की चैतन्य येते. शासनाचे धोरण हे पर्यटन विकासाचे आहे. इतिहासात रमण्यापेक्षा इतिहास घडविणे महत्त्वाचे आहे. स्वराज्य रक्षणासाठी मुठभर मावळे होते. पण त्यांची मुठ मजबूत होती. या परिसराच्या सर्वांगिण विकासासाठी शासन सर्वोतोपरी सहकार्य करेल, असे त्यांनी सांगितले.
यावेळी माहिती आणि जनसंपर्क राज्य मंत्री आदिती तटकरे यांचे भाषण झाले..

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते यावेळी कृषि विभागाच्या शेतकरी योजनेच्या चित्रफितीचे अनावरण करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close