ताज्या घडामोडीशैक्षणिक

*गरजू विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार पोचवा- शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांचे आदेश*

शेअर करा

मुंबई दि 28 मार्च टीम सीएमन्यूज

Advertisement

राज्यात 15 एप्रिल पर्यंत लॉक डाऊन झालेले आहे. राज्यातील सर्व शाळा बंद आहेत .अशावेळी शाळेत असलेले पोषण आहार कडधान्य शाळेतील गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोचवण्याचे अधिकार शाळेच्या स्थानिक समितीकडे सोपवण्याचा निर्णय राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी घेतला असल्याचे सांगितले. केंद्र आणि राज्य शासनाने 15 एप्रिल पर्यंत लॉक डाऊन करण्याचे आदेश बजावले आहेत यामुळे शाळेत देखील विद्यार्थी नाहीत इयत्ता आठवी पर्यंत सर्व परीक्षा देखील रद्द करण्यात आले आहेत अशावेळी शाळेमध्ये विद्यार्थी येत नसला तरी शाळेतील विद्यार्थी उपाशी राहू नये यासाठी राज्य शासनाने दिलेले शालेय पोषण आहाराचे धान्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था शाळेच्या मुख्याध्यापकांनी स्थानिक नियामक मंडळाच्या सल्ल्याने करावी अर्थात त्यामुळे शाळेमध्ये कुठल्याही प्रकारची गर्दी होणार नाही याची खबरदारी घ्यावी यासंदर्भात जिल्हाधिकारी आणि पोलिस यंत्रणेला देखील माहिती द्यावी वि शाळेचा विद्यार्थी उपाशी राहू नये हा यामागचा उद्देश असून शाळेत विद्यार्थ्यांची गर्दी जमू नये पोषण आहार वाटप करताना याची काळजी घ्यावी शक्यतो हा आहार विद्यार्थ्यांना घरपोच कसा पो देता येईल याची खबरदारी शाळेच्या व्यवस्थापनाने घेणे गरजेचे आहे शालेय शिक्षण आहार शाळेत पडून न राहता गरजू विद्यार्थ्यांपर्यंत देणे हा यामागचा उद्देश असून शालेय प्रशासनाने यासंदर्भात निर्णय घ्यावा असे आदेश शालेय शिक्षण मंत्र्यांनी बजावले आहेत राज्यात लोक डाऊन मुळे मजुरांवर उपासमारीची वेळ येत आहे अशा मजुरांना विविध सेवाभावी संस्थांकडून आणि प्रशासनाकडून मदत केली जात असताना या मजुरांची मुले देखील जिल्हा परिषद किंवा खाजगी शाळेमध्ये जातात या विद्यार्थ्यांच्या वाट्याला येणारे शालेय पोषण आहाराचे धान्य कडधान्य शाळेत असताना ही विद्यार्थी उपाशी राहू नयेत याची काळजी शालेय प्रशासनाने घेणे गरजेचे आहे असे आदेशात नमूद करण्यात आले असून यासंदर्भात शालेय शिक्षण मंत्र्यांनी यासंदर्भात अध्यादेश देखील जारी केला आहे शालेय शिक्षण मंत्र्यांच्या आदेशामुळे रोज मजुरांच्या मुलांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Advertisement

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!
Close
Close