जागतिक महिला दिन विशेष *सखी वन स्टॉप सेंटर;45 दिवसात 41 महिला प्रकरणे*
नगर दि 7 मार्च ।टीम सीएमन्यूज
राज्यात 26 जानेवारी रोजी महिला बालविकास विभागामार्फत वन स्टॉप सेंटर अर्थात सखी केंद्र सुरू करण्यात आली .अहमदनगर येथेही या केंद्राची सुरुवात करण्यात आली .अवघ्या 45 दिवसांपूर्वी सुरू करण्यात आलेल्या या केंद्रात 41 केसेस हाताळण्यात आल्या आहेत .
पीडित महिलांना वैद्यकीय मदत, मानसिक आधार,कायदेशीर सल्ला सुरक्षितता आणि तात्पुरता निवारा यासाठी सखी केंद्राची स्थापना करण्यात आली .महिला बालविकास विभागामार्फत चालविल्या जात असलेल्या या केंद्रातून अहमदनगर जिल्ह्यातील 41 महिलांचे प्रकरणे हाताळण्यात आली .त्यापैकी 31 प्रकरणे हे कौटुंबिक वादाची होती .यामध्ये पिटा कायद्यानुसार दाखल झालेल्या महिला ,बाल लैंगिक अत्याचाराच्या घटना यांचा समावेश आहे.
येथील सखी केंद्राबद्दल माहिती देताना केंद्र व्यवस्थापक प्रियांका सोनवणे यांनी सांगितले की,या वन स्टॉप सेंटर चा फायदा जिल्ह्यातील पीडितांना होत आहे ,गेल्या 45 दिवसात 41 महिलांची प्रकरणे याद्वारे हाताळण्यात आली .महिलांवर होणारे अत्याचार यामुळे महिला आपले घर सोडून निघून जातात ,जास्तीत जास्त वेळा त्या बस स्थानक किंवा रेल्वे स्टेशन वर पहावयास मिळतात .अशा महिलांना आधार देण्याचे काम या केंद्राद्वारे केले जाते .महिलांना कायदेशीर सल्ला देऊन त्यांना न्यायालयात आधार देणे,त्यांच्यावर वैद्यकीय उपचार करण्यासाठी नर्स,समुपदेशक या सर्वांचा समावेश आहे .
या केंद्राचा विस्तार आता होत आहे ,सखी स्टॉप थेट गावातील महिलांपर्यंत पोहचविण्यासाठी गावागावात महिला ‘आधार गट’तयार करून महिलांना आधार देण्यास वांबोरी येथून सुरुवात केली जाणार आहे,महिला दिनाच्या निमित्ताने वांबोरी येथे श्रीरामपूर येथील अतिरिक्त पोलीस अधीक्षक दीपाली काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे,यावेळी महिला बालविकास अधिकारी विजयमाला माने,स्नेहालय संस्थेचे शाम असावा उपस्थित असणार आहेत.