ताज्या घडामोडीमहाराष्ट्रशैक्षणिक

*जिल्हा परिषदेतील शिक्षकांच्या बदल्या संगणकीय अॉनलाईन पध्दतीनेच कराव्यात – राजेंद्र लाड*

शेअर करा

आष्टी दि.17 फेब्रुवारी/टीम सीएमन्यूूज

Advertisement

राज्यातील जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्या संदर्भात शासनाच्या अभ्यास गटाने औरंगाबाद विभागातील सर्व शिक्षक संघटनेच्या जिल्हाध्यक्षांची बैठक दिनांक १७ फेब्रुवारी २०२० रोजी विभागीय आयुक्त कार्यालय, औरंगाबाद येथे आयोजित करण्यात आलेली होती.यावेळी सदरील बैठकीस अभ्यास गटाचे सदस्य संजय कोलते मु.का.अ.उस्मानाबाद,राहुल कर्डीले मु.का.अ.चंद्रपूर हे उपस्थित होते.
बैठकीत जवळ जवळ सर्वच शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी ग्रामविकास विभाग महाराष्ट्र शासन मुंबई यांनी २७/०२/२०१७ रोजी काढलेला आदेश कायम ठेवून त्या नुसारच बदल्या कराव्यात याबाबत मते मांडली.मात्र त्या आदेशात काही सुधारणा करण्यात याव्यात याबाबत बीड जिल्हा दिव्यांग कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र लाड यांनी अभ्यासगटा समोर दिव्यांग कर्मचारी,मतीमंद मुलांचे पालक यांच्यानंतर दिव्यांग कर्मचाऱ्यांचे अव्यंग जोडीदार आणि अव्यंग कर्मचारी यांचा दिव्यांग जोडीदार ही बाब समाविष्ट करावी,विशेष संवर्ग भाग १ मधील दिव्यांग शिक्षकांना बदली हवी असल्यास किंवा बदली पात्र यादीत नाव असतांना बदली नको असल्यास त्यांनी विवरणपत्रातील नमूद केल्याप्रमाणे अर्ज करावा या संगणकीय आँनलाईन शासन निर्णयातील मजकुरात कोणताही बदल करण्यात येवू नये,तो शासन निर्णय २७ फेब्रुवारी २०१७ अन्वये पूर्वीप्रमाणेच ठेवावा,तसेच संवर्ग १ मध्ये दिव्यांग कर्मचारी यांना सवलत घेतांना त्यांचे प्रमाणपत्र ऑनलाईन असावे व ऑनलाईन प्रमाणपत्र क्रमांक नोंदविण्यासाठी सोय उपलब्ध करून दयावी.
तसेच बोगस दिव्यांगत्व प्रमाणपत्र दाखवून जो बदली करवून घेतो त्याच्यावर गंभीर कार्यवाही व्हावी या प्रमुख सुधारणा समितीसमोर सुचवण्यात आल्या आहेत.या बैठकीत समिती कडून प्रत्येक संघटनेला वेळ देण्यात आला होता.दिव्यांग कर्मचारी संघटनेने सुचविलेल्या सुधारणांचा समिती गांभीर्याने विचार करील असे मत राजेंद्र लाड यांनी शेवटी व्यक्त केले.

Advertisement

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!
Close
Close
%d bloggers like this: