कृषीवार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

*तंत्रज्ञानाच्या मदतीने कृषि क्षेत्रातील उत्पादनात वाढ करणे शक्य-कुलगुरु डॉ. के.पी. विश्वनाथा*

शेअर करा

राहुरी 6 /टीम सीएम न्यू्ज नेेटवर्क
भारत हा कृषि प्रधान देश असून आज कृषि क्षेत्रात नवनविन तंत्रज्ञानाचा वापर झपाट्याने होत आहे. ड्रोन, यंत्रमानव, कृत्रिम बुध्दी या तंत्रज्ञानाचा प्रसार व प्रचार मोठ्या प्रमाणात होणे गरजेचे आहे. जेणेकरुन कृषि क्षेत्रातील तरुणांना रोजगार प्राप्तीबरोबरच कृषिचा विकास साधता येईल त्याचबरोबर तंत्रज्ञानाच्या मदतीने कृषि क्षेत्रातील उत्पादनात वाढ करणे शक्य असल्याचे प्रतिपादन कुलगुरु डॉ. के.पी. विश्वनाथा यांनी केले.

Advertisement

जागतिक बँक अर्थसहाय्यीत, राष्ट्रीय कृषि उच्च शिक्षण प्रकल्प व भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्ली, यांच्या संयुक्त विद्यमाने हवामान अद्ययावत शेती व जलव्यवस्थापनाचे आधुनिक कृषि विज्ञान तंत्रज्ञान केंद्र, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे ड्रोन, यंत्रमानव, कृत्रिम बुध्दी व शेती अवजारे या विषयी आंतरराष्ट्रीय वैज्ञानीक-विद्यार्थी संवादाचे आयोजन डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या सभागृहात करण्यात आले होते. या संवादाचे उद्घाटन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. के.पी. विश्वनाथा यांच्या हस्ते झाले यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर अधिष्ठाता डॉ. अशोक फरांदे, पदव्युत्तर महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. यशवंत फुलपगारे, पुत्रा विद्यापीठ, मलेशियाचे डॉ. शिवा बालासुंदरम, मिसिसिपी स्टेट विद्यापीठ, यु.एस.ए.चे डॉ. जी.सी. बोरा, एशियन तंत्रज्ञान संस्था, बँकॉकचे डॉ. मंजुळकुमार हजारिका, वॉशिग्टन स्टेट विद्यापीठ, यु.एस.ए.चे डॉ. शिंदुजा शंकरन, डॉ. लव खोत, प्रा. डेव्हीड ब्राऊन व हवामान आधारीत शेती व जलव्यवस्थापन प्रकल्पाचे प्रकल्प समन्वयक डॉ. सुनिल गोरंटीवार उपस्थित होते.
यावेळी डॉ. शिवा के. बालसुंदरम, डॉ. जी.सी. बोरा, डॉ. मंजुळकुमार हजारिका, डॉ. शिंदुजा शंकरन, डॉ. लव खोत, प्रा. डेव्हीड ब्राऊन यांनी वेगवेगळ्या विषयांवर मार्गदर्शन केले. या शास्त्रज्ञ विद्यार्थी संवादात पदव्युत्तर, आचार्य पदवी तसेच प्राध्यापक वर्ग असे एकुण 230 विद्यार्थी सहभागी झाले होते. या संवादाचे सूत्रसंचालन प्रकल्प समन्वयक डॉ. सुनिल गोरंटीवार यांनी तर आभार प्रकल्प सहसमन्वयक डॉ. मुकुंद शिंदे यांनी मानले. या संवादाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. चैतन्य पांडे, इंजि. योगेश दिघे व डॉ. जे. राजेश यांनी परिश्रम घेतले.

Advertisement

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!
Close
Close
%d bloggers like this: