ब्रेकिंग न्यूजमराठवाडा आणि विदर्भ

*ते 24 ऊसतोडणी मजूर कालपासून नगरच्या बॉर्डरवर*

ऊसतोडणी मजुरांचे हाल

शेअर करा

आष्टी दि,21 टीम सीएमन्यूज

दुसऱ्या जिल्ह्यामध्ये असलेल्या ऊसतोडणी मजुरांचे आगमन बीड जिल्ह्यामध्ये सुरू आहे.मात्र आष्टी तालुक्यातील वाकी चेक पोस्ट वर कालपासून 24 ऊसतोडणी कामगार आपल्या कुटुंबासह अडकून पडले आहेत.त्यांच्याकडे मजुरांची यादी नसल्याने त्यांना वाकी चेक पोस्टवरून माघारी नगर जिल्ह्याच्या हद्दीत पाठविण्यात आले .
सातारा जिल्ह्यातील जयवंत शुगर या कारखान्यावर कामाला गेलेले मजूर काल सायंकाळी वाकी चेक पोस्ट वर गावी चिंचोली येथे जाण्यासाठी आले होते .त्यांनी तपासणी
करताना त्यांच्याकडे कारखाना यादी नसल्याचे आढळून आल्यानंतर त्यांना परत नदीच्या सीना नदीच्यापलीकडे नगर जिल्ह्याच्या हद्दीत पाठविण्यात आले .
यासंदर्भात जालिंदर म्हस्के यांनी सांगीतले की ,”आमच्याकडे यादी नसल्याने आम्हाला परत मागे पाठविण्यात आले .आम्ही कालपासून येथे कुटुंबासह मुक्कामाला आहोत”.

दरम्यान बीडच्या प्रशासनाकडे या नागरिकांची परवानगीची यादी उशिरा प्राप्त झाली असल्याचे कळते. मात्र आज दुपारपर्यंत हे मजूर येथेच अडकून पडल्याचे दिसून आले

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close