ब्रेकिंग न्यूज

*तो ‘बाधित’ कोरोना मुक्त झाला आणि जिल्हाही*

*कोरोना मुक्तीनंतर रुग्ण घरी परतला*

शेअर करा

 

आष्टी दि 24, एप्रिल टीम सीएमन्यूज

गेल्या पंधरा दिवसापूर्वी बीड जिल्ह्यामध्ये आढळून आलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा अहवाल पंधरा दिवसानंतरचा दुसरा अहवाल नकारात्मक आल्याने त्याला आज त्याच्या पिंपळा येथील घरी सोडण्यात आले.त्यामुळे बीड जिल्हाही कोरोना मुक्त झाला.
बीड जिल्हा कोरोना मुक्त असताना अहमदनगर जिल्ह्यातील मरकज च्या संपर्कात आलेल्या व्यक्तीमूळे पिंपळा येथील एक व्यक्ती पॉझिटिव्ह झाला होता. आज या व्यक्तीला 108 एम्बुलेंस मधून त्याच्या गावी पिंपळा येथे त्याच्या घरी सोडण्यात आहे .आता तो पूर्णपणे कोरोना मुक्त झाला आहे.

अहमदनगर येथील बूथ हॉस्पिटलच्या विलगीकरण कक्षात असलेल्या या पिंपळा येथील व्यक्तीचा पंधराव्या दिवसांनंतर चा रिपोर्ट हा नकारात्मक आल्यानंतर त्याला त्याच्या गावी म्हणजेच पिंपळा येथे सोडण्यात आले.

Advertisement
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!
Close
Close
%d bloggers like this: