ब्रेकिंग न्यूज
Trending

*त्या 26 नागरिकांना पोलिस कोठडी;3 न्यायालयीन कोठडीत*

नगरमधील मरकज प्रकरण

शेअर करा

 

नगर दि 18 टीम सीएमन्यूज

दिल्लीच्या मरकजसाठी आलेले परदेशी नागरिक हे कायद्याचे उल्लंघन करून नगरमध्ये राहिल्याने शुक्रवारी पोलिसांनी अटक केली.त्यांना आज जिल्हा सत्र न्यायालयासमोर आणण्यात आले यापैकी 26 परदेशी नागरिकांना सहा दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली त्यांना 24 एप्रिल पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे तर पोलीस कोठडीत तर 3 भारतीय नागरिकांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश अहमदनगर सत्र न्यायालयाने दिले .

सिव्हिल हास्पिटलमधून सोडल्यानंतर २९ परदेशी नागरिकांना अटक करण्यात आली होती . दिल्लीतील निजामुद्दीनमध्ये मरकजसाठी अनेक देशातील नागरिक आले होते. त्यातील काही जण नगरमधील मुकुंदनगर, जामखेड, नेवासा येथील धार्मिक स्थळी राहिले होते. या तिन्ही ठिकाणी पोलिसांनी कारवाई करून या सर्वांना ताब्यात घेऊन त्यांची वैद्यकीय तपासणी केली. त्यात काही नागरिकांना करोनाची लागण झाल्याचे तपासणीत समोर आले आहे. जिबुती, बेनिन, डिकोटा, आयव्हेरी कोस्ट, घाना, इंडोनेशिया, ब्रुनई या देशातील हे नागरिक आहेत. पर्यटनाच्या व्हिसा वर आलेले हे नागरिक धार्मिक प्रसार करत असल्याचे उघड झाल्याचा आरोप यासह इतर आरोपाखाली त्यांना अटक करण्यात आले होते .

त्यांना वास्तव्य करण्यास मदत करणाच्यांविरूद्ध यापूर्वीच गुन्हा नोंदविण्यात आला आहे. यातील चार जणांना करोनाची लागण झाली होती. तर इतरांना सिव्हिलमध्ये विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close