ताज्या घडामोडीदेशविदेशराजकीय

*दिल्लीतील आप पक्षाच्या विजयाने अरविंद केजरीवाल यानी जन की बात देशाला दाखवून दिली;शिवसेना पक्ष प्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया*

शेअर करा

 

मुंबई दि.11/टीम सीएमन्यूज
शिवसेनेचे पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री
उद्धव ठाकरे यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या विजयाबद्दल अभिनंदन केले असून भाजपला फटकारले आहे .याबद्दल प्रतिक्रिया देताना ठाकरे यांनी म्हटले आहे की,
आपण म्हणजेच देशप्रेमी आणि आपल्याला विरोध करणारे देशद्रोही हा काहींच्या मनातील भ्रमाचा भोपळा दिल्लीकर मतदारांनी फोड़ला आहे .दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीत अरविंद दिल्लीतील जनतेने मन की बात नव्हे तर जन की बात आता देशात चालणार हे दाखवून दिले आहे. तथाकथीत राष्ट्रीय विचारांचे सरकार दिल्लीत असून आणि त्यानी सर्व ताकद पणाला लावूनही त्यांचा झाड़ू समोर टिकाव लागला नाही , बलाढ्य पक्षाने आपले रथी महारथी निवडणुकीत उतरवून , अरविंद केजरीवाल यांची थेट दहशदवाद्यांशी तुलना करुन, स्थानीक प्रश्नावरुन दुर्लक्ष करण्यासाठी विनाकारण आंतरराष्ट्रीय विषय आणून मतदारांचे मन विचलीत करण्याचा प्रयत्न करुन सुद्धा अरविंद केजरीवाल याना ते पराजीत करू शकले नाहीत , दिल्लीतील जनता विकास करणाऱ्या प्रामाणिक माणसाच्या मागे ठामपणे ऊभी राहिली आणि जनतेने लोकशाही वरचा भरोसा कायम असल्याचे दाखवले. आपण तेवढेच देशप्रेमी आणि आपल्याला विरोध करणारे आणि इतर सर्व देशद्रोही हा काहींच्या मनातील भ्रमाचा भोपळा ही दिल्लीकर मतदारांनी फोड़ला , दिल्लीकर जनतेचे आणि अरविंद केजरीवाल यांचे मी महाराष्ट्रातर्फे आणि शिवसैनेतर्फे मन:पूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांच्या भावी विकासमय वाटचालीस शुभेच्छा देतो.”
अशी प्रतिक्रीया शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यानी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात व्यक्त केली आहे.

Advertisement
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!
Close
Close
%d bloggers like this: