*देवदर्शनाला गेलेल्या भक्तांवर काळाचा घात; भीषण अपघातात सहा ठार, सात जखमी*
चंद्रपूर. ता.20 फेब्रुवारी । टीम सीएमन्यूज
चंद्रपूर जिल्ह्यात राहणारे भोयर आणि झोडे कुटुंबिय देवदर्शनासाठी भंडारा जिल्ह्यातील प्रतापगड येथे गेले होते. रात्री देवदर्शन घेऊन परत येत असतांना चंद्रपूर-मूल मार्गावरील केसलाघाट-नागाळा या मार्गावर रात्री १०:४५ वाजताच्या दरम्यान स्कार्पिओ चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या नादुरुस्त ट्रकला धडक दिली.
या अपघाताची तिष्णता अधिक असल्याने वाहनातील सात भाविकांचा जागीच मृत्यू झाला असून सहा जण गंभीर जखमी झाले आहे. यामध्ये जखमींची नावे जितेंद्र पटपल्लीवर, मनीषा भोयर, अंकिता पेटकुले, क्रिश पाटील, सोमी पाटील, शीला पाटील, आणि रेखा खटिकर यांचा समावेश आहे. सर्व मृतकांचे शव मूल येथील उपजिल्हा रुग्णालयात ठेवण्यात आले असून, गंभीर जखमींना जिल्हा रुग्णालया चंद्रपूर येथे उपचारासाठी नेण्यात आले आहेत. मुतांमध्ये दोन पुरुष, तीन महिला, आणि दिड वर्षाच्या मुलाचा समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी सर्वोपरी मदतीचे कार्य केले असून घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली असून अपघाताची चौकशी सुरू आहेत.