ताज्या घडामोडीमराठवाडा

*परळीत पुन्हा स्त्री जातीचे अर्भक ;सुप्रिया सुळे आणि धनंजय मुंडे यांनी स्वीकारले पालकत्व*

शेअर करा

 

परळी दि.24 /टीम सी एम न्यूज
परळी शहरात काल नुकत्याच जन्मलेल्या स्त्री जातीच्या अर्भकाला रेल्वे रुळाजवळ काटेरी झुडुपात टाकून दिल्याचे काही नागरिकांच्या निदर्शनास आले .त्यांनी या स्त्री जातीच्या अर्भकाला दवाखान्यात दाखल केले .या अर्भकाच्या देखभालीसाठी परळीचे आमदार तथा राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी या मुलीचे पालकत्व स्वीकारले आहे.तसेच खा. सुप्रियाताई सुळे यांच्या मदतीने या मुलीचे पालकत्व स्वीकारत, या नवजात मुलीचे ‘शिवकन्या’ असे नामकरण केले आहे.

सदरील स्त्री जातीचे नवजात अर्भक काटेरी झुडपात टाकण्यात आले असल्याचे समजते, रात्री ८ च्या सुमारास मुलीच्या रडण्याचा आवाज परिसरातील नागरिकांनी ऐकल्यानंतर हा प्रकार समोर आला. हा निर्दयी प्रकार नेमका कोणी केला हे अजून समजू शकले नाही; मात्र या प्रकाराची माहिती मिळताच परळी शहरासह परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा पोलिस तपास घेत आहेत.

Advertisement

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!
Close
Close
%d bloggers like this: