ताज्या घडामोडीप.महाराष्ट्र

पाथर्डी- *अवकाळी पावसाचा फटका दोघांचा मृत्यू*

शेअर करा

 

पाथर्डी दि 27 टीम सीएमन्यूज
अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील सोनोशी येथे अंगावर पत्र्याचे शेड पडून कलाबाई उत्तम दौंड (वय-८०) या वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. दुसऱ्या घटनेत आडगाव येथे अंगावर वीज पडून गणेश रामनाथ लोंढे (वय 19) या तरुणाचा मृत्यू झाला आहे.

पाथर्डी शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागात आज सायंकाळी जोरदार वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहेत. या जोरदार वादळात ग्रामीण भागातील अनेक ठिकाणी घराचे पत्रे आणि भिंती पडून काही महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांना शहरातील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी अहमदनगर येथे हलवण्यात आले आहेत. ग्रामीण भागातील बऱ्याच गावांमध्ये घराचे पत्रे उडाल्याने आणि भिंती पडल्याने अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. शहरातील बाबूजी आव्हाड महाविद्यालायचे देखील मोठे नुकसान झाले असून यामध्ये विद्यालयाचे पत्रे, तसेच सौरपॅनल, वॉल कंपाउंड, झाडे यांचे नुकसान झाले आहे.

शेतकऱ्यांच्या पिकांचे देखील मोठे नुकसान झाले आहे.
तसेच जोरदार वाऱ्यांमुळे शहरासह ग्रामीण भागातील अनेक ठिकाणच्या वीजवाहक तारा तुटल्याने विजेचा मोठा प्रश्न नागरिकांसमोर उभा राहिला आहे. शहरात देखील अनेक ठिकाणी तारा तुटल्या असून या तारा जोडण्याचे काम पाथर्डीच्या विद्युत वितरण कंपनीच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून युद्धपातळीवर चालू आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close