मराठवाडा आणि विदर्भ

*पिंपळा व परिसरातील गावामधील कंटेंन्मेंट झोन व बफर झोनमध्ये प्रतिबंधात्मक व्यवस्था शिथिल- जिल्हाधिकारी राहुल रेखावार*

रुग्ण न आढळल्याने उपाययोजना

शेअर करा

 

आष्टी दि,23 टीम सीएमन्यूज

पिंपळा येथे कोरोनाचा रुग्ण आढळून आला होता . या कंटेंन्मेंट झोन व बफर झोन परिसरातील सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाल्याने तसेच या परिसरात एकही संशयित रुग्ण आढळून आलेला नसल्यामुळे लागू केलेल्या सर्व प्रतिबंधात्मक व्यवस्था शिथिल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत.
आष्टी तालुक्यातील पिंपळा ता. आष्टी येथे कोरोनाचा रुग्ण आढळून आला होता त्यामुळे पिंपळा या गावापासून ३ कि.मी (पिपंळासह, सुयेवाडी, धनगरवाडी, काकडवाडी, ढोबळमांगवी व खरडगाण) हा परिसर Containment Zone a४ कि.मी. परिसरातील (लोणी,नांदूर सोलापुरवाडी, टेफळ पु., कोयाळ ) ही गावे Buffer Zone म्हणून घोषीत करुन सदरील गावे व परिसरात पुढील अनिश्चित कालावधीसाठी ०७ एप्रिल २०२० रोजी फौजदारी प्रक्रिया दंड संहिताचे कलम १४४ (१)(३) अन्वये पूर्णवेळ बंद करण्यात येऊन संचारबंदी लागू करण्यात आली होती.
जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद,बीड यांनी २३ एप्रिल २०२० रोजी पिंपळा ता.आष्टी येथील ३ किलोमीटर परिसरात घरोघर सर्वेक्षण व ७ किलोमीटर परिसरातील वााडी, वस्ती, तांडे यामध्ये लक्षणानुसार सर्वेक्षण हि कार्यवाही १४ दिवस पूर्ण झाली असून पहिला फॉलोअप थ्रोट स्वॅब नमुना (१४ दिवसानंतरचा) निगेटिव्ह आढळून आला आहे. पिंपळा ता.आष्टी व परिसरातील आरोग्य विभागामार्फत चालु असलेले सर्वेक्षण पूर्ण झाले असून तेथील प्रतिबंधात्मक व्यवस्था शिधील करण्यात यावी , हि विनंती केली आहे.
पिंपळा ता.आष्टी येथील कोरोना रुग्णास १४ दिवस पूर्ण झालले असल्यामुळे शासनाचे नियमा नुसार Containment Zoneव Buffer Zone मधील प्रक्रिया पूर्ण झालेली असल्यामुळे आणि एकही संशयीत रुग्ण या भागात आढळून येत नसल्यामुळे यापूर्वी या कार्यालयाचे आदेश शिथील करण्यात येत आहेत.
तसेच या आदेशा शिवाय जिल्हयासाठी काढलेले या आधीचे आदेश व यानंतरचे आदेश सर्व आदेश लागू राहतील असे सूचित केले आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close