*पिंपळ्यातील परिस्थिती पूर्वपदावर*
कडा, दि,24 एप्रिल टीमसीएम न्यूज
बीड जिल्ह्यातील एकमेव कोरोना पॉझिटिव्ह चाचणी आलेला व्यक्ती कोरोनामुक्त होऊन आज घरी परतला. त्यामुळे पिंपळासह परिसरातील गावांनी मोकळा श्वास घेतला आहे.आता गाव पूर्वपदावर येत आहे.
आष्टी तालुक्यातील पिंपळा येथील एका जणांला नगर येथील नातेवाईकाच्या संपर्कात आल्याने कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने त्याला नगर येथे ७ एप्रिल पासून उपचारासाठी पाठवण्यात आले होते. पिंपळा सह सहा गावे बाधित क्षेत्र तर लोणी सह काही गावे संभाव्य बाधित क्षेत्र म्हणून संपूर्ण लॉकडाऊन करणयात आली होती . गावात जीवनावश्यक सह सर्व दुकाने बंद होती . तर दूध संकलन देखील ठप्प झाले होते . मात्र कोरोना बाधित व्यक्तीचे १४ दिवसानंतरचे सर्व रिपोर्ट निगेटिव्ह आले . त्यामुळे गावातील लॉकडाऊन विषम तारखेला शिथिल करणयात आले . कोरोनामुक्त झालेली व्यक्ती आज ( शुक्रवारी) दुपारी तीनच्या सुमारास घरी परतली . गावात आजपासूनच बंद पडलेले दूध संकलन परत सुरू झाले . शनिवारी सकाळी सात ते साडेनऊ या वेळेत जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठा करणारी दुकाने उघडी राहणार आहेत.