ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पीडितांना मोबदला मिळवून देण्यासाठी बीड पोलिसांचे प्रशिक्षण

शेअर करा

बीड : १७ फेब्रुवारी/ टीम सीएमन्यूज

गंभीर गुन्हे व महिलांच्या गुन्ह्यात पोडितांना मोबदला मिळवून देण्यासाठी पोलिसांची भूमिका महत्वाची असते. जर पोलीस या संदर्भात अनभिज्ञ असतील तर पीडितांना नुकसान भरपाई कशी मिळणार यासाठी शासनाच्या मनोधर्य योजनेची अंमलबजावणी कशी करायची याच खास प्रशिक्षण बीड पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या मार्गदर्शनाखाली दिशा या संस्थेमार्फत देण्यात आले. पोलीस अधीक्षक कार्यालयातील सभागृहात “पोलिसांची भूमिका आणि सहकार्य” या विषयाबर दिशा या सामाजिक सेवाभावी संस्थेकडून पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांना  प्रशिक्षण देण्यात आले.यावेळी पोलीस अधीक्षक  हर्ष ए.पोदार,अप्पर पोलीस अधीक्षक,सर्व पोलीस उपअधीक्षक आणि सर्व पोलीस टाण्याचे प्रभारी अधिकारी,यांच्यासह पोलीस अधिकारी उपस्थित होते.

“दिशा” या सामाजिक सेवाभावी संस्थेचे संचालक श्री प्रविण खांडपासोळे आणि श्रीमती ज्योती खांडपासोळे यांनी “गंभीर गुन्हे व महिलांच्या गुन्ह्यात पीडितांना मोबदला मिळवून देण्यासाठी पोलिसांची भूमिका आणि सहकार्य” या विषयावर प्रशिक्षण दिले. यामध्ये प्रामुख्याने गुन्हा पीडितांचे पुनर्वसन, संयुक्त राष्ट्राने 1985 साली गुन्हा पीडितांच्या पुनर्वसनासाठीची लागू केलेळी  मूलभूत तत्त्वांची रचना,त्यानुसार शासनाची पीडितांच्या पुनर्वसनासाठी ची यंत्रणा व तरतुदी, महाराष्ट्र गुन्हा पिडीत व्यक्तींकरिता नुकसान भरपाई योजना 2014 व त्यातील तरतुदी,बाल पाडितांच्या पुनर्वसनासाठी माहितो,बालकांचे लेंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा 2012 व त्यातील बालकांच्या संरक्षणासाठी व हितासाठी असलेल्या तरतुदी,महिला पीडिता साठीच्या “मनोधैय” योजनेची माहिती व तरतूदी,फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 357 ए.सी अंतर्गत असलेल्या तरतुदी, इत्यादीची सविस्तर माहिती व अंमलबजावणी प्रक्रिया याविषयी सर्व अधिकारी व कर्मचारी यांना सखोल प्रशिक्षण देण्यात आले, या प्रकारचे प्रशिक्षण पोलीस अधिकाऱ्यांसाठी  आयोजित करणारा बीड हा राज्यातील तिसरा जिल्हा आहे.मा.पोलीस अधीक्षक यांनी सर्व प्रभारी अधिकारी व कर्मचारी यांना गुन्ह्यातील पीडितांना मोबदला मिळवून देण्यासाठी तत्पर राहून पीडितांना सर्वतोपरी मदत करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close