ब्रेकिंग न्यूजमराठवाडा आणि विदर्भ

*पोलीस अधीक्षकांच्या भेटीने ते 24 ऊसतोडणी कामगार घरच्या वाटेवर*

*कामगारांच्या चेहऱ्यावर फुलले हसू*

शेअर करा

 

आष्टी दि,21 टीम सीएमन्यूज

गेल्या 24 तासापासून अधिक वेळ कागदपत्रे अभावी अडकून पडलेल्या ऊसतोडणी मजुरांचा प्रश्न जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी सोडवला आणि त्यांचा गावी जाण्याचा मार्ग मोकळा झाला.
पर जिल्ह्यातील ऊसतोडणी कामगार बीड जिल्ह्यामध्ये परत येत आहेत .मात्र आष्टी तालुक्यातील वाकी चेक पोस्ट वर कालपासून 24 ऊसतोडणी कामगार आपल्या कुटुंबासह अडकून पडले होते .त्यांच्याकडे मजुरांची यादी नसल्याने त्यांना वाकी चेक पोस्टवरून माघारी नगर जिल्ह्याच्या हद्दीत पाठविण्यात आले होते.
सातारा जिल्ह्यातील जयवंत शुगर या कारखान्यावर कामाला गेलेले मजूर काल सायंकाळी वाकी चेक पोस्ट वर गावी चिंचोली येथे जाण्यासाठी आले होते .त्यांनी तपासणी
करताना त्यांच्याकडे कारखाना यादी नसल्याचे आढळून आल्यानंतर त्यांना परत नदीच्या सीना नदीच्यापलीकडे नगर जिल्ह्याच्या हद्दीत पाठविण्यात आले होते.

सायंकाळी बीड जिल्हा पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी वाकी येथील चेक पोस्ट ला भेट देऊन पाहणी केली .येथील कर्मचाऱ्यांशी संवाद साधला .यावेळी या ठिकाणी येणाऱ्या अडचणीं संदर्भात विचारणा केली .यावेळी नदीपलिकडे गेल्या 24 तासाहून अधिक वेळ अडकून पडलेल्या कामगारांची कल्पना त्यांना देण्यात आली .यावेळी त्यांनी तात्काळ जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याशी संपर्क करून त्यांना या संदर्भात कल्पना देण्यात आली .त्यांनी या संदर्भात निर्णय घेऊन त्यांना घरी पाठविण्याचे आदेश दिले .
या वेळी पंचायत समिती सदस्य संदीप अस्वर ,ग्रामपंचायत सदस्य संदीप कारंजकर ,बाबासाहेब ससाणे उपस्थित होते .गेल्या 24 तासापासून अडकून पडलेल्या कामगारांच्या चेहऱ्यावर हसू फुलले .

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close