ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

*प्रवासभाडे सवलतीच्या प्रतिपुर्तीपोटी एसटीला शासनाकडून रुपये २२० कोटी ..*

शेअर करा

 

मुंबई :४ फेब्रुवारी/टीम सीएमन्यूज

राज्य परिवहन महामंडळामार्फत एसटी प्रवाशांना देण्यात येणाऱ्या विविध प्रवासभाडे सवलतीच्या प्रतिपुर्तीपोटी राज्य शासनाने २२० कोटी रुपये एसटी महामंडळास रोखीने दिले आहेत.

एसटी महामंडळाद्वारे राज्य शासनाने वेळोवेळी दिलेल्या आदेशानुसार विविध प्रवाशीवर्गाला प्रवास भाड्यात ३३ टक्क्यापासून १०० टक्क्यापर्यंत सवलत देण्यात येते. या खर्चाची प्रतिपूर्ती राज्य शासन एसटी महामंडळाला करीत असते. त्यानुसार ऑगस्ट २०१९ ते नोव्हेंबर २०१९ या चार महिन्यांच्या कालावधीतील शिल्लक सवलत मूल्याच्या रकमेपैकी रु. ४७८ कोटी ९५ लक्ष ७४ हजार २२२/- रोखीने वितरित करण्याचा प्रस्ताव महामंडळाने राज्य शासनास सादर केला होता. त्यानुसार एसटी महामंडळास ऑगस्ट २०१९ ते नोव्हेंबर २०१९ या कालावधीतील विविध प्रवासभाडे सवलत मूल्याच्या प्रतिपुर्तीपोटी द्यावयाच्या एकूण रकमेपैकी २२० कोटी रुपये देण्यात आले आहेत.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close