Top-न्यूज

*प्रशासनाच्या नियोजनाने पिंपळा येथील परिस्थिती मध्ये सुधार*

*कोरोना पॉझिटिव्ह गावातील स्थिती*

शेअर करा

 

आष्टी ,दि 16 टीम सीएमन्यूज

तालुका प्रशासनाची साथ आणि स्थानिक युवकांचा पुढाकार यामुळे बीड जिल्ह्यातील एकमेव कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण जिथे आढळला त्या पिंपळा ( ता आष्टी ) येथील ग्रामस्थांना धान्य आणि किराणा वितरण सुरळीतपणे मिळू लागले आहे . पिण्याच्या पाण्याचा टँकरसह पिठाची गिरणी देखील सुरू झाली आहे.

आष्टी तालुक्यातील पिंपळा येथील रहिवाशी असलेल्या व्यक्तीला अहमदनगर येथे गेल्याने कोरोना संसर्ग झाला त्यामुळे पिंपळासह आजूबाजूची काही गावे बाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली. गावात अनिश्चित कालावधीसाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे .मात्र अचानक आलेल्या या संकटाने अनेकांच्या दैनंदिन गरजांवर परिणाम झाला. घरातील धान्य आणि किराणा संपला तर करायचे काय हा प्रश्न निर्माण झाला , गावचे युवा सरपंच आकाश लोखंडे यांनी ही मग पुढाकार घेत गावातील पाच सहा युवकांना अत्यावश्यक सेवेसाठी बाहेर पडता येईल याची परवानगी घेतली . त्या युवकांच्या सहकार्याने गावातील घराघरात किराणा पोहोच करता येऊ शकतो काय याचा विचार विनिमय केला .

 

आष्टीच्या तहसीलदार निलिमा थेऊरकर यांना याबाबत माहिती दिली . त्यांनी ही गावात येऊन त्याचे योग्य नियोजन आणि मार्गदर्शन केले . एका ट्रॅक्टरमध्ये स्वस्त धान्य भरून तो प्रत्येक घरासमोर नेला . घरातील लाभार्थीनुसार त्यांना द्वारपोच धान्य दिले . एका व्हाट्सअप नंबर वर प्रत्येक ग्रामस्थाला लागणाऱ्या किरण्याची यादी पाठवण्यास सांगण्यात आली . त्यानुसार किराणा पॅकिंग करण्यात आला आणि संबंधित कुटुंबाला पोहोच करण्यात आला . ग्रामस्थांनी त्याचे पैसे अदा केले , ते दुकानदारास पोहोच करण्यात आले असे कोरोना कृती समितीचे उपाध्यक्ष सचिन भस्मे या युवकाने सांगितले .तसेच सरपंच आकाश लोखंडे यांच्या मागणीप्रमाणे तहसीलदार निलिमा थेऊरकर यांनी दोन पिठाच्या गिरणी सुरू करण्यास परवानगी दिली . आता गावकरी तिथे दळण आणून ठेवतात . गिरणी चालक ते दळून झाल्यावर घेऊन जाण्यासाठी फोन करतो . त्यामुळे कुठे ही गर्दी होत नाही .


या गावचे रहिवासी आणि आष्टी तालुका ग्रामीण पुरवठा कार्यालयाचे अभियंता सुनील कुलकर्णी यांनी पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी टँकर उपलब्ध करून दिला आहे .सुरुवातीला खासगी टँकर द्वारे गावात पाणी पुरवण्यात आले .आता या गावाला शासकीय टँकर मंजूर करण्यात आला आहे .गावकरी आपापल्या दारात हा भांडी मांडून ठेवतात . टँकरमधून आणलेले पाणी भरून ठेवले की भांडी घरात घेऊन जातात . सगळीकडे मानवी स्पर्श अथवा संपर्क टाळला जातो . एकूणच प्रशासनाची साथ आणि ग्रामस्थांचे सहकार्य यामुळे पिंपळा येथील परिस्थिती पूर्वपदावर येऊ लागली आहे .

वेळेत गावाच्या सीमा बंद केल्याने कोरोना बंद करण्यात प्रशासन आणि गावकरी यशस्वी होत आहे .

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close