क्रीडाताज्या घडामोडी

*फेडरेशन कप व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाच्या सहाय्यक प्रशिक्षकपदी श्री प्रीतम सिंग दुमाळे*

शेअर करा

श्रीरामपूर: १७ फेब्रुवारी/टीम सीएमन्यूज

Advertisement

चित्तोडगढ,राजस्थान येथे सुरू असलेल्या ३३ व्या राष्ट्रीय फेडरेशन कप व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्र महिला व्हॉलीबॉल संघाच्या सहाय्यक प्रशिक्षक पदी श्री प्रितमसिंग दुमाले यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

दिनांक १६ फेब्रुवारी ते २१ फेब्रुवारी दरम्यान चित्तोडगढ, राजस्थान येथे या राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन भारतीय व्हॉलिबॉल महासंघ व राजस्थान व्हॉलिबॉल असोसिएशनच्या वतीने करण्यात आले आहे.श्री दुमाले हे महाराष्ट्र व्हॉलिबॉल संघटनेचे कार्यालयीन अधिक्षक असून त्यांनी अनेक राष्ट्रीय स्पर्धेसाठी सहाय्यक प्रशिक्षक म्हणून काम पाहिले आहे. सहाय्यक प्रशिक्षकपदी निवड झाल्याबद्दल श्री दुमाले यांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस श्री अविनाश आदिक,महाराष्ट्र व्हॉलिबॉल संघटनेचे अध्यक्ष श्री पार्थ दोषी, श्री राजेंद्र कोहकडे,श्री राजेंद्र पाटणकर,श्री दादासाहेब तुपे,श्री आदिनाथ कोल्हे,श्री नितिन बलराज,श्री नितीन गायधनी श्री सुनील चोळके, श्री अविनाश चौखंडे आदींनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.

Advertisement

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!
Close
Close
%d bloggers like this: