मराठवाडा आणि विदर्भ
Trending

*बीड मध्ये 440 दुचाकी जप्त*

बीड वाहतुक शाखेची कारवाई

शेअर करा

 

बीड ,दि 13 एप्रिल ,टीम सीएम न्यूज

संचारबंदी शिथिलीकरण असतांना लोक मोठ्या प्रमाणावर दुचाकी, आणि चारचाकी वाहने घेवून घराबाहेर पडून रस्त्यावर गर्दी करत असल्याचे पोलीसांच्या निदर्शनास आल्याने दुचाकी चालकांवर कारवाई करण्यात आली .

संचारबंदी शिथिलीकरण कालावधीत नागरिकांनी दुचाकी घेवुन घराबाहेर न पडता पायी चालत जावुन जवळच्या भागातून अत्यावश्यक सेवा प्राप्त कराव्यात असे अपेक्षित आहे आणि याच कारणास्तव अत्यावश्यक सेवा देणारे वाहने वगळता इतर वाहनांना बीड जिल्ह्यात इंधन देणे बाबत ,पेट्रोल पंप चालकांना सक्त मनाई करण्यात आले आहे.
अशा प्रकारचे नियम जिल्हाधिकारी बीड यांच्या कडून पुर्ण जिल्ह्यात लागू आहेत. तरी या
नियमाची पायमल्ली करत नागरिक संचारबंदी शिथिलीकरण कालावधीत मोठ्या प्रमाणात वाहनांचा वापर करून विशिष्ट भागात गर्दी करत आहेत. त्यामुळे संचारबंदी शिथिलीकरण कालावधीत बीड वाहतूक पोलिसांनी साठे चौक, शिवाजी चौक,नगर नाका ,बीड शहर
पोलीस ठाणे समोर, शिवाजीनगर पोलीस ठाणे समोर या ठिकाणी बीड शहरातील एकूण 440 वाहने ताब्यात घेवून त्यांच्यावर कारवाई केली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक हर्ष ए.पोद्दार आणि अपर पोलिस अधिक्षक विजय
कबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली बीड वाहतुक शाखेचे पोलीस निरीक्षक राजीव तळेकर आणि सर्व वाहतुक पोलीस कर्मचारी टिमने केली.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close