**नगर जिल्ह्यात 12 नवीन रुग्ण,संगमनेरचे 7 बाधित*
**नगर जिल्ह्यात 12 नवीन रुग्ण,संगमनेरचे 7 बाधित*

 

अहमदनगर दि 21, टीम सीएमन्यूज

अहमदनगर जिल्ह्यात कोरोना बाधित १२ नवीन रुग्ण वाढले असून ही संख्या 296 इतकी झाली आहे . संगमनेर तालुक्यातील ०७ पारनेर तालुका आणि नगर शहरातील प्रत्येकी दोघेजण तर अकोले तालुक्यातील एक जण बाधित झाले आहेत . जिल्ह्यात अक्टिव्ह कोरोना बाधितांची संख्या 39 इतकी आहे .

अहमदनगर जिल्ह्यात १२ नवीन कोरोना बाधितांची भर पडली आहे .यामध्ये संगमनेर तालुक्यातील ०७तर पारनेर तालुक्यातील दोन आणि नगर शहरातील दोन आणि अकोले तालुक्यातील एक व्यक्तीच्या समावेश आहे.

*संगमनेर तालुक्यातील कोल्हेवाडी येथील 44 वर्षीय आणि ६० वर्षीय पुरुषाला कोरोनाची लागण झाली आहे .संगमनेर शहरातील राजवाडा भागातील 38 वर्षीय महिला, दिल्ली नाका येथील 42 वर्षीय पुरुष, नाईकवाडपुरा येथील 65 वर्षीय महिला आणि 36 वर्षीय पुरुष, भारत नगर येथील 70 वर्षीय पुरुष यांचा अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
पारनेर तालुक्यातील गोरेगाव येथील 30 वर्षीय पुरुष ,भोयरे पठार येथील 28 वर्षीय पुरुष यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असून यापूर्वीच्या बाधित झालेल्या व्यक्तीच्या संपर्कामुळे ही लागण झाली आहे .
नगर शहरातील झेंडीगेट येतील 54 वर्षीय पुरुषाला तर नालेगाव येथील 58 वर्षीय महिलेला कोरोनाची बाधा झाली आहे .
अकोले तालुक्यातील कोतूळ येथील 48 वर्षीय पुरुषाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
दरम्यान, आज सकाळी अहमदनगर जिल्ह्यातील ०८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. नगर शहरातील ०४, राहाता येथील ०३ आणि संगमनेर येथील ०१ रुग्ण बरा होऊन घरी परतले . कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या २४५ इतकी झाली आहे.

Share this story