*तळीरामांचा साठी खुशखबर नगर जिल्ह्यातील वाईन शॉप सुरू होणार*
*तळीरामांचा साठी खुशखबर नगर जिल्ह्यातील वाईन शॉप सुरू होणार*

Ahmednagar-liquor-shop-start-

नगर दि,4 मे टीम सीएमन्यूज

अनेक दिवसांपासून प्रतिक्षेत असलेल्या दारूच्या दुकानाचे दरवाजे आता उघडले जाणार आहेत. काही अटी शर्तीवर हे दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे .
अहमदनगरचे जिल्हाधिकारी राहुल दिवेदी यांनी हा निर्णय घेतला असून सकाळी दहा ते 5 वाजेपर्यंत ही दारूची दुकाने उघडी ठेवण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. ही परवानगी देताना जिल्हाधिकारी यांनी सामाजिक अंतराचे भान ठेवून तसेच गर्दी न होता दारू विकण्याचे आदेश दिले आहेत.

राज्य आणि केंद्र सरकारने यासंदर्भात 3 मे रोजी ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये असलेल्या जिल्ह्यांमध्ये दारूची दुकाने उघडे ठेवण्यास सशर्त परवानगी दिली होती. यासंदर्भात राहुल दिवेदी यांनी 4 मे रोजी हे आदेश जारी केले आहेत..

ही दुकाने चालू करत असताना त्याने सामाजिक अंतराचे भान ठेवणे आवश्यक आहे त्याचबरोबर येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाचं स्क्रीनिंग करून संबंधिताला खोकला, सर्दी नाही याची खात्री करूनच त्यासंबंधी त्याला दारू विकण्याचे आदेश दिवेदी यांनी दिले आहेत. या मध्ये दुकानाच्या समोर कुठल्याही प्रकारची गर्दी होणार नाही आणि वर्तुळे तयार करून संबंधित ग्राहक त्या वर्तुळातून आणि दोन ग्राहकांमध्ये तीन फुटाचे अंतर असावे असे आदेश त्यांनी दिले आहेत.
अहमदनगर जिल्ह्यातील दारू दुकानाच्या विक्रीला जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेली परवानगी ही मद्यप्राशन करणाऱ्या नागरिकांसाठी गुड न्यूज म्हणावी लागेल.

Share this story