कावळ्यांच्या पाठोपाठ आता शिरापूर येथे कोंबड्यांचा मृत्यू?
कावळ्यांच्या पाठोपाठ आता शिरापूर येथे कोंबड्यांचा मृत्यू?

 

आष्टी दि 12 प्रतिनिधी
मुगगाव तालुका पाटोदा येथील कावळ्यांच्या मृत्यू नंतर आष्टी तालुक्यातील शिरापूर येथे कोंबड्यांचा मृत्यू झाल्याची माहिती पुढे आली आहे.

गेल्या दोन दिवसांपूर्वी 9 तारखेच्या दरम्यान शिरापूर येथील किरण तागड यांच्या 20 ते 25 कोंबड्या अचानक मेल्या.त्यांनी ह्या कोंबड्या नदीला फेकून दिल्या.तागड यांच्या प्रमाणे शिरापूर येथील चव्हाण बंधूंच्या कोंबड्या अचानक मेल्या.एका भावाच्या 30 ते 35 आणि दुसऱ्या भावाच्या 50 ते 60 कोंबड्या रोगाने मरण पावल्या. त्यांनी या कोंबड्या पोत्यात भरून नदीच्या कडेला फेकल्याचे सांगितले.
या तीनही शेतकऱ्यांना या बर्ड फ्लू बद्दल माहिती नसल्याने त्यांनी मृत कोंबड्यांची परस्पर विल्हेवाट केली.आज संबंधित शेतकऱ्यांना संपर्क केला असता त्यांनी सांगितले. या शेतकऱ्यांची खुराडे रिकामी झाली असून काही कोंबड्या मूर्च्छा येऊन पडत असल्याचे त्यांनी सांगितले.

कुत्रे ही मेले

याबाबत अधिक माहिती देताना किरण तागड यांनी सांगितले की ,ह्या कोंबड्या फेकून दिल्यानंतर कुत्र्यांनी त्यावर ताव मारला त्यामध्ये दोन कुत्र्यांचा मृत्यू झाला.

या कोंबड्यांचा मृत्यू नेमका कशाने ?

बीड जिल्ह्यात बर्ड फ्ल्यू ने शिरकाव केल्याचे मुगगाव येथील कावळ्यांच्या मृत्यूने पुढे आले.त्यानंतर शिरापूर येथील कोंबड्यांच्या मृत्यू ने आणखी गूढ निर्माण केले आहे.

यासंदर्भात आष्टी तालुका पशु वैद्यकीय अधिकारी डॉ मंगेश ढेरे यांच्याशी संपर्क साधला असता शिरापूर येथे तपासणी करण्यासाठी टीम जाणार असल्याचे सांगितले.

हेही वाचा:त्या ९ गावात कोंबड्याच्या खरेदी विक्री आणि वाहतुकीस बंदी;संसर्गित क्षेत्र जाहीर

Share this story