*आष्टीच्या कोरोना बाधित महिलेचा नगरमध्ये मृत्यू;बीड जिल्ह्यात ३७ पॉझिटिव्ह*
*आष्टीच्या कोरोना बाधित महिलेचा नगरमध्ये मृत्यू;बीड जिल्ह्यात ३७ पॉझिटिव्ह*

बीड दि ३० जुलै टीम सीएम न्यूज

बीड जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्हची संख्या कमी होताना दिसत नाही, उलट दररोज नव्याने कोरोना बाधितांची भर पडत आहे. जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अहवालात तब्बल ३७ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत. जिल्हाभरात आज तीन बाधित व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये आष्टी तालुक्यातील डोईठाण येथील महिलेचा अहमदनगर येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला.

प्रशासनाला आज  ४६७ अहवाल प्राप्त झाले. त्यामध्ये ३७ पॉझिटिव्ह तर ४३० व्यक्ती निगेटिव्ह आढळून आले. आजच्या अहवालात सर्वाधिक पॉझिटिव्ह हे परळी येथील त्या खालोखाल बीड मधील १० व्यक्ती,अंबाजोगाई ०४, गेवराई माजलगाव प्रत्येकी दोन आणि आष्टी ,केज प्रत्येकी  एक असे एकूण ३७ पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील डोईठाण येथील महिलेचा अहमदनगर येथे मृत्यू झाला. गेवराई येथील एका व्यक्तीचा बीड येथे  जिल्हा रुग्णालयात तर बीड शहरातील व्यक्तीचा औरंगाबाद येथे मृत्यू झाला.

 

१० – बीड:-

२३ वर्षीय महिला (रा.जुन्या एसपी ऑफिस जवळ,गणेशनगर,बीड शहर पॉझिटिव्ह रुग्णाचा सहबासीत),५० वर्षीय महिला (रा.जुन्या एसपी ऑफिस जवळ, गणेशनगर,बीड शहर पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत),४२ वर्षीय पुरुष (रा.विप्रनगर,बीड शहर पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत),४८ वर्षीय पुरुष (रा.पिताजी यशोदा अपार्टमेंट,धानोरा रोड,बीड शहर),६५ वर्षीय महिला (रा.जुना बाजार,बीड शहर),४७ वर्षीय पुरुष (रा.शुक्रवारपेठ, तकवा,बीड शहर),५४ वर्षीय महिला (रा.खासबागदेवी रोड,बीड शहर), ७२ वर्षीय महिला (रा.शुक्रवारपेठ, बीड शहर),८० वर्षीय पुरुष (रा.पिताजी आयकॉन अपार्टमेंट,भगवान प्रतिष्ठान जवळ,बीड शहर),५२ वर्षीय पुरुष (रा.काळे गल्ली ,बीड शहर),

१७ – परळी:-

३० वर्षीय पुरुष (रा.बॅक कॉलनी,परळी शहर,पत्त्याबाबत खात्री करणे सुरु आहे),३५ वर्षीय पुरुष (रा.विद्यानगर, परळी शहर पॉझिटिव्ह रुग्णाचा सहबासीत),२० वर्षीय पुरुष (रा.टीपीएस कॉलनी, परळी शहर पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत),३३ वर्षीय पुरुष (रा.ता.परळी पत्त्याबाबत खात्री करणे सुरु आहे),२७ वर्षीय पुरुष (रा.टीपीएस कॉलनी,परळी शहर पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत),४५ वर्षीय महिला (रा.आयोध्या नगर, परळी शहर),४३ वर्षीय पुरुष (रा.इंडस्ट्रिअल भाग, परळी शहर),५४ वर्षीय महिला (रा.जलालपुर रोड, परळी शहर),२४ वर्षीय महिला (रा.इंडस्ट्रिअल भाग,परळी शहर),६५ वर्षीय पुरुष (रा.माणीक नगर, परळी शहर),२१ वर्षीय पुरुष (रा.माणीक नगर,परळी शहर),३८ वर्षीय पुरुष (रा.विद्यानगर,परळी शहर),३५ वर्षीय पुरुष (रा.धर्मापुरी,ता.परळी पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत),४० वर्षीय पुरुष (रा.इंडस्ट्रिअल भाग,परळी शहर),४५ वर्षीय पुरुष (रा.धर्मापुरी ता.परळी पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत),३५ वर्षीय महिला (रा.टोकवाडी ता.परळी पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत),२० वर्षीय पुरुष (रा.हमालवाडी ता.परळी शहर पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत)

 

০४ – अंबाजोगाई :-

५० वर्षीय महिला (रा.झारे गल्ली, अंबाजोगाई शहर पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत),११ वर्षीय पुरुष (रा.अनुराग कॉलनी अंबाजोगाई शहर पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत),४४ वर्षीय पुरुष (रा.बलुतेचा मळा, अंबाजोगाई शहर पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत ),५५ वर्षीय पुरुष (रा.झारे गल्ली, अंबाजोगाई शहर पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत ).

०२ – गेबराई:-

५० वर्षीय पुरुष (रा.मोंढा रोड, गेवराई शहर,औरंगाबाद येथे उपचार सुरु),४४ वर्षीय पुरुष (रा.मोमीन गल्ली गेवराई शहर, पॉझिटिव्ह रुग्णाचा सहवासीत, औरंगाबाद येथे उपचार सुरु)

०२ – माजलगाव :-

३० वर्षीय महिला (रा.वैष्णवी मंगल कार्यालय,माजलगाव शहर) ,७७ वर्षीय पुरुष (रा.नवनाथ नगर, परिवर्तन बॅकच्या जवळ,माजलगाव शहर)

०१ – आष्टी ५० वर्षीय महिला (रा.डोईठाण ता. आप्टी)

०१ – केज  २५ वर्षीय महिला (रा.भवानी चौक, धारुर रोड,केज शहर)

हेही:वाचा आईचे कष्ट आणि बहिणीच्या पाठबळावर ती बनली कर सहायक अधिकारी

Share this story