ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

*भीमा कोरेगावचा तपास केंद्राकडे देणार नाही* *मुख्यमंत्र्यांनी केले जाहीर*

शेअर करा

 

रत्नागिरी:दि 18 फेब्रुवारी।सीएमन्यूज

चांदा ते बांदा योजनेला पर्याय म्हणून ठाकरे सरकारने रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी सिंधू रत्न समृद्धी विकास योजना जाहीर केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सिंधुदुर्ग नगरी इथं पत्रकार परिषदेत या योजनेविषयी माहिती दिली. या योजनेमध्ये नवीन विकासात्मक योजनांसह प्रलंबित विकास योजना, घरकुल योजना, नळपाणीपुरवठा, तसंच पर्यटन यांचा समावेश आहे अशी माहिती मुख्यमंत्री ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. तसंच एल्गार आणि भीमा कोरेगाव हे विषय वेगवेगळे असून भीमा कोरेगावचा तपास कोणत्याही परिस्थितीत केंद्राकडे देणार नाही, असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.
या पत्रकार परिषदेला रत्नागिरीचे पालकमंत्री ऍड. अनिल परब सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत, आमदार दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत, आमदार योगेश कदम, नार्वेकर उपस्थित होते.
पत्रकार परिषद आटोपल्यावर मुख्यमंत्र्यांनी सिंधुदुर्ग किल्ल्याची पाहणी केली. त्यानंतर ते चिपी विमानतळ येथे रवाना झाले.

Advertisement

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!
Close
Close
%d bloggers like this: