Top-न्यूजमराठवाडा आणि विदर्भ
Trending

*मास्क नाही पाचशे; थुंकल्यास हजार,दुचाकीवर हजार दंड :जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचा आदेश*

बीड जिल्ह्यात कडक निर्बंध

शेअर करा

 

बीड ,दि 14 एप्रिल ,टीम सीएमन्यूज

बीड जिल्ह्यात आपत्ती निवारण कायदा,साथरोग नियंत्रण कायदा,संचारबंदी लागू करण्यात आली आहे .या कायद्याची काटेकोर अंमलबजावणी व्हावी आणि कोरोना संसर्गाला नियंत्रण करण्यात यावे यासाठी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी कडक निर्बंध घातले आहेत.

संचारबंदीच्या काळात अनेक नागरिक नियमाची पायमल्ली करताना दिसत आहेत .त्यातच कोविड 19 या विषाणूचा ज्या मूळे संसर्ग होऊ शकतो अशा बाबींचा विचार करून हे निर्बंध घालण्यात आले आहेत .हे सर्व नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती ,दुकानदार यांच्या विरुद्ध या कायद्यानुसार कारवाई केली जाणार आहे .हे सर्व नियम फौजदारी असून स्थनिक स्वराज्य संस्था आणि शासकीय कार्यालये यांनी याची अंमलबजावणी करायची आहे .

बीड जिल्ह्यामध्ये लागू केलेल्या कलम 144 आणि साथरोग निवारण , आपत्ती निवारण कायद्याच्या अनुषंगाने बीड जिल्ह्यातील नागरिकांवर जिल्हा प्रशासनाच्या वतीने बंधन टाकण्यात आले आहेत.

सार्वजनिक ठिकाणी सार्वजनिक कार्यालयांच्या परिसरात थुंकल्यास त्याला एक हजार रुपयांचा दंड केला जाणार आहे .हा दंड संबंधित शासकीय कार्यालय किंवा स्थानिक स्वराज्य संस्था यांना हे अधिकार देण्यात आले आहेत .
संचारबंदी च्या काळामध्ये नागरिकांनी बाहेर पडू नये .बीडचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी आपल्या अधिकाराच्या अंतर्गत हे निर्णय घेतले असून यामध्ये त्यांनी सहा निर्णय घेतले आहे या सहा निर्णयांमध्ये एखाद्या व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी जर थुंकल्यास अशा व्यक्तीला एक हजार रुपये दंड करून त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे तसेच या संदर्भातली कार्यवाही ही स्थानिक स्वराज्य संस्था किंवा संबंधित शासकीय कार्यालय यांना करावी लागणार आहे.

सार्वजनिक ठिकाणी जात असताना व्यक्तीने मास्क न लावल्यास अशा व्यक्तीला पाचशे रुपये दंड आकारण्यात येणार आहे तसेच ही कारवाई सुद्धा फौजदारी स्वरूपाचे असणार असून यासंदर्भात स्थानिक स्वराज्य संस्था किंवा स्थानिक कार्यालय शासकीय कार्यालय हे त्याची अंमलबजावणी करणार आहेत.

संचारबंदी शिथील असताना जर नागरिकांनी एखाद्या दुकानासमोर गर्दी केली आणि त्या संबंधित दुकानदाराने सामाजिक अंतराचा अवलंब न करता जर ग्राहकांना विक्री करत असेल आणि यामध्ये ग्राहक सुद्धा जर सोशल डिस्टन्स चा वापर न करता जर खरेदी करत असतील तर अशा वेळी संबंधित विक्रेत्याला दोन हजार रुपयांचा दंड आणि ग्राहकाला दोनशे रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे.

किराणा दुकानदारांनी आपल्या दुकानाच्या दर्शनी भागावर जर दरपत्रक लावले नाही तर अशा दुकानदाराच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येणार असून या दुकानदारांना पाच हजार रुपयांचा दंड आकारला जाणार आहे.

सार्वजनिक ठिकाणी वावरत असताना एखाद्या व्यक्तीच्या समवेत जर 18 वर्षापेक्षा कमी आणि 80 वर्षीय वर्षापेक्षा जास्त वयाची व्यक्ती असेल तर अश्या व्यक्तीला एक हजार रुपयांचा दंड केला जाणार आहे.

संचार बंदीच्या काळामध्ये दुचाकी वापरण्यावर जिल्हा प्रशासनाने निर्बंध घातले आहेत. जर एखादा व्यक्ती दुचाकीवर भाजीपाला आणि किराणामाल आणताना जर आढळून आल्यास अशा व्यक्तीवर विरुद्ध कारवाई करून त्याला एक हजार रुपये दंड केला जाणार आहे.

हे सर्व दंड संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था आणि शासकीय कार्यालय यांच्याकडे या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे अधिकार देण्यात आले असून यासंदर्भात त्यांनी नियमाचे उल्लंघन केले असल्याची फोटो किंवा व्हिडिओ शूटिंग सुद्धा करण्याचा आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत.
.
आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 25 पोट कलम 2(अ), साथरोग प्रतिबंधक कायदा 1897 अन्वये निर्गमित करण्यात आलेली अधिसूचना व नियमावलीमधील तरतुदीनुसार गर्दी टाळण्यासाठी तसेच फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144(1) (3) अन्वये मनाई आदेशाचे उल्लंघन होवू नये यासाठी जिल्हाधिकारी यांनी हे आदेश दिले आहेत. कोणत्याही व्यक्तीने अथवा संस्थेने या आदेशाची भंग केल्यास भारतीय दंडसंहिता 1860 (45) याच्या कलम 188 शिक्षेसपात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल आणि दिवाणी व फौजदारी कार्यवाही करण्यात येईल.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close