आरोग्यकृषीवार्ताक्रीडाताज्या घडामोडीदेशविदेशप.महाराष्ट्रफॅशनमनोरंजनमराठवाडामहाराष्ट्रराजकीयविदर्भ

यवतमाळ ; जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या सदस्य एसीबीच्या जाळ्यात

शेअर करा

यवतमाळ जिल्हा जातपडताळणी समितीच्या प्रमुख लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकल्या आहेत. जया राऊत असे या महिला अधिकाऱ्याचे नाव असून त्या समाजकल्याण उपायुक्त आहेत. जया विनोद राऊत यांचेसह जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती चे वरिष्ठ लिपिक नितीन कडे व सावन प्रकाश चॊधरी या खाजगी व्यक्तीविरुद्ध एसीबी ने गुन्हा नोंदविला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील तक्रारदार शिक्षकाला जात वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी जया राऊत यांनी २ लाख रुपये लाच मागितली होती, याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अमरावती येथे तक्रार नोंदवून दीड लाख रुपयेचा पहिला टप्पा देण्याचे कबूल केले. त्यानुसार १५ हजार रुपयांच्या खऱ्या नोटांसोबत १,३५००० रुपयांच्या मुलांच्या खेळण्यातील नकली नोटांचे बंडल तक्रारदाराने खाजगी व्यक्तीमार्फत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या सदस्य जया राऊत यांना पोहोचविले, कार्यालयात लाचेची रक्कम स्वीकारताच जया राऊत आणि सावन चौधरी या दोघांना एसीबीने अटक केली आहे. या कारवाईमुळे समाजकल्याण विभागात खळबळ उडाली आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close