ताज्या घडामोडीमराठवाडाशैक्षणिक

*या कारणाने केली शाळा बंद*

शेअर करा

*या कारणाने केली शाळा बंद*

Advertisement

पाटोदा/ टीम सीएमन्यूज

पाटोदा तालुक्यातील अनपटवाडी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा पैठण पंढरपूर महामार्गालगत येत असल्याने आणि अगदीच शाळेच्या जवळून हा महामार्ग जात असल्याने विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे .शाळा दुसरीकडे हलवावी अशी मागणी पालकांनी करत शाळेला कुलूप ठोकले आहे.
या संदर्भात शाळेच्या मुख्याध्यापकांनी गटशिक्षणाधिकारी यांना कळवून मार्गदर्शन मागितले आहे .
यापूर्वी या शाळेला अतिक्रमण हटवण्यासाठी महामार्ग विभागाने पत्र दिले आहे.शाळेतील विद्यार्थिनीने पालक गणेश विष्णू जायभाय यांनी शाळेला कुलूप ठोकले आहे .मुलांच्या जीविताचा विचार करून शाळा हलविण्याची मागणी होत आहे.

यावेळी गटशिक्षणाधिकारी *धनंजय बोंदार्डे* यांनी सांगितले की , “कोणतीही सूचना न देता शाळेला कुलूप ठोकले आहे,तसेच रस्त्यापासून दूर शाळेची एक खोली आहे, तिथे एकाने अतिक्रमन करुन स्वस्त धान्य दूकान टाकले आहे ते काढून तिथे शाळा भरवण्याची सुचना दिली आहे”

Advertisement

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!
Close
Close
%d bloggers like this: