महाराष्ट्र

*येत्या 14 एप्रिलला समतेचे दिवे लावून भीमजयंती घरीच साजरी करा – केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले*

शेअर करा

 

मुंबई दि.13 एप्रिल ,टीम सीएम न्यु्ज

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी आपले संपूर्ण जीवन समतेसाठी वाहिले.त्यांनी भारताला दिलेल्या संविधानाचे सार समतेच्या तत्वात आहे.त्यामुळे समतेचे प्रज्ञासूर्य ठरलेल्या महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची जयंती यंदाच्या 14 एप्रिल ला आपल्या घरीच राहून साजरी करताना घराघरात समतेचे दिवे लावण्याचे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी केले आहे.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता यंदाची भीम जयंती घरीच राहून साजरी करावी ;कोणत्याही स्वरूपात बाहेर मनोरंजनाचे जाहीर कार्यक्रम लावून मिरवणूक काढून गर्दी जमविण्याचा प्रयत्न कोणीही करू नये. भीम जयंती दरवर्षी आपण एप्रिल ते जून महिन्या पर्यंत साजरी करीत असतो. यावर्षी कोरोनाचे जीवघेणे संकट देशावर घोंघावत असताना लॉकडाऊनचा नियम पाळणे आवश्यक आहे. त्यामुळे यंदा 14 एप्रिलला आपण घरीच राहून भीम जयंती साजरी करावी असे आवाहन ना.रामदास आठवले यांनी केले आहे.

 

 

यंदा 14 एप्रिलला भीमजयंती दिनी सकाळी 11 वाजता सर्वांनी आपल्या घरी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून बुद्ध वंदना घ्यावी;पुरणपोळी; मिठाई वाटावी त्यांनंतर सायंकाळी आपल्या घराच्या दारात समतेचा दिवा लावून महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील समतावादी भारत साकारण्याचा निर्धार करावा असे आवाहन ना.रामदास आठवले यांनी केले आहे.
14 एप्रिल ला महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त परिसरातील महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यासाठी प्रशासनाने 3 लोकांना परवानगी द्यावी. अनेक ठिकाणी जिल्हा अधिकारी कार्यालय; रेल्वे स्टेशन; शहरांत मध्यवर्ती चौकांमध्ये अनेक ठिकाणी डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळे आहेत तेथे 14 एप्रिल ला पुष्पहार अर्पण करण्यासाठी 3 व्यक्तींना परवानगी प्रशासनाने द्यावी असे आवाहन ना रामदास आठवले यांनी केले आहे.

 

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close