Top-न्यूज

*राज्यात २३२ नवीन रुग्णांची नोंद; ९ जणांचा मृत्यू*रुग्ण संख्या२९१६*

*एकूण २९५ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी-आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती*

शेअर करा

मुंबई, दि. १५ टीम सीएमन्यूज

आज राज्यात कोरोनाबाधित २३२ नवीन रुग्णांची नोंदझाली. यामुळे एकूण रुग्ण संख्या२९१६ झाली आहे. आजदिवसभरात ३६ रुग्णांना घरीसोडण्यात आले असून आतापर्यंतराज्यभरात २९५ रुग्ण बरे झालेआहेत. अशी माहिती आरोग्यमंत्रीराजेश टोपे यांनी आज दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ५२हजार नमुन्यांपैकी ४८ हजार १९८जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोनाकरिता निगेटिव्ह आले आहेत तर२९१६  जण पॉझिटिव्ह आले आहेत.सध्या राज्यात ६९ हजार ७३८ लोकहोम क्वारंटाईनमध्ये असून ५६१७ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्येआहेत.

राज्यात आज ९ कोरोना बाधितरुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकीमुंबईचे २, पुण्यातील ६ तर अकोलामनपा येथील १ रुग्ण आहे.  त्यात ६  पुरुष तर  ३  महिला आहेत.आज झालेल्या ९  मृत्यूपैकी ४ जणहे ६० वर्षांवरील आहेत ३  रुग्ण हेवय वर्षे ४० ते ६० या वयोगटातीलआहेत.  तर दोघेजण ४०वर्षाखालील आहेत. मृत्युमुखीपडलेल्या ९ जणांपैकी ६ रुग्णांमध्ये(६७ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब,अस्थमा, हृदयरोग अशा स्वरुपाचेअतिजोखमीचे आजार आढळलेआहेत. कोरोनामुळे राज्यातझालेल्या मृत्यूंची संख्या आता १८७झाली आहे.

राज्यातील ज्या भागात रुग्णांचेक्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणीकेंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसारक्लस्टर कंटेनमेंट कृतियोजनाअंमलात आणण्यात येत आहे.राज्यात आज एकूण ५३९४  सर्वेक्षणपथकांनी  काम केले असून त्यांनी२० लाखाहून अधिक लोकसंख्येचेसर्वेक्षण केलेले आहे.

Advertisement
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!
Close
Close
%d bloggers like this: