fbpx
ताज्या घडामोडीमराठवाडा

*विडा कोरडेवाडी रस्त्यावर देशी दारू सह अवैध वाहतूक करणारे दोन हायवा टिप्पर पकडले*

शेअर करा

 

स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने केली कारवाई

केज दि 28 मार्च ,टीम सीएमन्यूज

केज तालुक्यातील विडा कोरडेवाडी रस्त्यावरून दोन मोटारसायकलवरून संचारबंदी असतानाही देशी दारू घेऊन जाणाऱ्या चौघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने पकडून त्याच्या कडून दोन मोटारसायकलसह १ लाख ४३२८० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला हि कारवाई करत असतानाच अवैधरित्या वाळू घेऊन जात असलेले दोन हायवा टिप्पर हि जप्त करण्यात आले आहेत हि कारवाई शनिवारी सकाळी सव्वा सात च्या सुमारास करण्यात आली

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राऊत यांच्या आदेशाने केज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैद्य धंदयावर कारवाई करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक कागुणे यांच्यासह पोलीस कर्मचारी गंपू पवार ,झुंबर गर्जे ,गोविंद काळे ,बालाजी दराडे ,हे हिवरा पहाडी मार्गे विडा येथे येत असताना गुप्त बातमीदारा मार्फत विडा येथून दोन मोटारसायकल वरून सहाजण देशी दारू विक्री करण्यासाठी बीड येथे घेऊन येत असल्याची माहिती मिळाली या माहितीवरून कोरडेवाडी शिवारातील हनुमान वस्ती जवळील पुलाजवळ स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने सापळा लाऊन अवैध्यरित्या मोटारसायकलवर पांढऱ्या पोत्यात देशी दारू घेऊन जात असलेल्या भीमा लक्ष्मण मस्के ,अमोल लक्ष्मण मस्के ,राजीव एकनाथ वाघमारे ,जालिंदर राम हिरवे रा.बीड याना ताब्यात घेतले असून भैया उर्फ अशोक सुखदेव भाले व राजू केरबा साठे हे दोघेजण पसार झाले पोलिसांनी आरोपी कडून देशी दारूसह दोन मोटारसायकल सह १ लाख ४३२८० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस नाईक संतोष विष्णुपंत हांगे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे हे कारवाई करत असतानाच स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने विडा कोरडेवाडी रस्त्यावरून अवैद्यरित्या वाळूची वाहतूक करत असलेले दोन हायवा टिप्पर पकडून जप्त करत केज पोलीस ठाण्यात आणून लावले आहेत,
या प्रकरणी पुढील तपास पोलीस नाईक श्रीराम चेवले करत आहेत

Advertisement

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close