diwali 2021 दुर्मीळ पुरातन बारव 3100 दिव्यांनी उजळली!
diwali 2021

श्रीगोंदा ,अमोल कविटकर 


diwali 2021 दिवाळी म्हटलं की दिपोत्सव , festival of lights दिव्यांचा सण,या निमित्ताने अहमदनगर जिल्ह्यातील  बेलवंडी कोठार येथील दोन  पुरातन बारवा दिव्यांनी उजळून निघाल्या.

बारव जतन मोहीम आणि शिवदुर्ग फाउंडेशनच्या वतीने जिल्ह्यातील बेलवंडी कोठार येथे असलेल्या पुरातन बारवे मध्ये सायंकाळी दीपोत्सव diwali 2021 साजरा करण्यात आला.

यामुळे संपूर्ण आसमंत दिव्यांच्या प्रकाशात न्हाऊन निघाला.

बेलवंडी कोठार येथे पुरातन बारव आहे या बारवेच्या जतन करण्यासाठी दरवर्षी या ठिकाणी फाउंडेशनच्या माध्यमातून दिवाळीचा दीपोत्सव diwali celebrations  साजरा केला जातो.

festival of lights

या बारवेच्या पायऱ्यांवर दिवे लावून दीपोत्सव साजरा करण्याची परंपरा येथील नागरिकांनी सुरू केली .

महाराष्ट्र बारव मोहीमच्या महाराष्ट्र बारव दीपोत्सव goddess lakshmi  अंतर्गत शिवदुर्ग ट्रेकर्स फाउंडेशनच्या वतीने बेलवंडी कोठार ता. श्रीगोंदा जि अहमदनगर येथील दोन बारववर दिवाळीच्या पूर्व संध्येला ३१०० दिव्यांची आरास करून भव्य दिवाळी दिपोत्सव diwali 2021 साजरा करण्यात आला.

एकाच ठिकाणी एक चालुक्य/यादव कालीन बारव आणि त्याच्या लगद शेजारी एक शिवकालीन शिंदे सरदार बारव दिव्यांनी सजवली.श्रीगोंदा तालुक्यातील पुरातन ऐतिहासिक वारसा अनेक वर्षानंतर पुन्हा दिव्यांनी उजळून निघाला.

 एकाच ठिकाणी वेगवेगळ्या कालखंडात बांधलेल्या दोन बारव एकत्र असण्याची महाराष्ट्रातील या दुर्मीळ बारव आहेत.

नगरच्या वैभवात भर घालणारे कॉफी मग म्यूझियम (Coffee mug museum)

 बेलवंडी कोठार येथील बारव दीपोत्सवसाठी festivals in india नाशिक उपजिल्हाधिकारी अरुण आनंदकर, श्रीगोंदा तहसीलदार मिलिंद कुलथे, महाराष्ट्र बारव मोहीमचे रोहन काळे, मुंबई मनोज सिनकर (पुणे) श्रीगोंदा पंचायत समितीच्या उपसभापती सौ. मनिषाताई कोठारे,बेलवंडी कोठारच्या सरपंच सौ.राजश्री कोठारे, उपसरपंच सौ.रोहिणी शिंदे,बाळासाहेब महाडिक, शिवदुर्ग चे अध्यक्ष राजेश इंगळे यांचेसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

diwali 2021 दोन बारव शेजारी असलेले हे ऐतिहासिक गाव 


 शिवदुर्ग ट्रेकर्स फाउंडेशनच्या सदस्यांनी हा दीपोत्सव diwali 2021 सोहळा पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले. 

श्रीगोंदा, दौंड, तालुक्यातील वेगवेगळ्या गावांतून एकत्रित येत शिवदुर्ग परिवाराच्या सदस्यांनी  ही diwali 2021 बारव सजवली.त्यांना बेलवंडी कोठार ग्रामस्थांनी व तरुण मुलांनी मोठं सहकार्य केले.यावेळी ग्रामस्थ उपस्थित होते.
 

Share this story