ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

*शिष्यवृत्ती योजनेत भ्रष्टाचार करणाऱ्या संबंधित संस्था आणि अधिकाऱ्यांवर कारवाई करणार -धनंजय मुंडे*

शेअर करा

 

मुंबई दि.12 मार्च । टीम सीएमन्यूज

मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी असणाऱ्या शिष्यवृत्ती योजनेत भ्रष्टाचार करणाऱ्या संबंधित संस्था आणि अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल आणि गुन्हेही दाखल करावे लागतील अशी ग्वाही सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी आज विधानपरिषदेत एका लक्षवेधी सूचनेला उत्तर देत होते.
२०१० ते २०१७ या कालावधीत 70 सामाजिक न्याय विभागाकडून शैक्षणिक संस्था आणि महाविद्यालयांच्या नावेऑफलाईन देण्यात येणारे शिष्यवृत्तीचे पैसे विद्यार्थ्यांना मिळत नसल्यासंदर्भात सक्त वसुली संचालनालयानं याची दखल घेत पुण्याच्या सामाजिक न्याय विभागाच्या प्रादेशिक उपायुक्तांकडून आर्थिक व्यवहारांची तात्काळ माहिती देण्याचे आदेश दिले आहेत यासंदर्भात भाजपाच्या विनायक मेटे यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित करत संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली . याबाबत नेमण्यात आलेल्या विशेष तपास पथकानं आपला अहवाल दिला असून यात १७० कोटी रुपयांचा गैरव्यवहार असल्याचं समोर आलं आहे असं धनंजय मुंडे यांनी सांगितलं.
सक्त वसुली संचालनालयाला आतापर्यंत ९५० पैकी ८०० महाविद्यालयांची माहिती प्राप्त झालेली आहे उर्वरित १५० महाविद्यालयांची माहिती प्राप्त व्हावी यासाठी इडीनं नोटीस बजावली आहे अशी माहिती सामाजिक न्याय मंत्र्यानी आपल्या उत्तरात दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close